akola-grain-market
अकोला ताज्या बातम्या

तुरीच्या दरात चढ उतार सुरु, सोयाबीनचे दर स्थिर मात्र आवक वाढली

अकोला: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांकडून राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी पत्रव्यवहार करावा, यासाठी शेतकरी संघटना आग्रही आहेत.

सोयापेंड निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. सोयापेंड निर्यात केल्यास सोयाबीनच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे. दुसरीकडे सोयाबीनचे दर आता स्थिरावले असून दरवाढीचे सध्या तरी कोणतेही चिन्ह दिसत नाही. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोयाबीनला किमान ४८५० ते कमाल ५२७० रुपये दर मिळाला आहे. दर कमी असले तरी शेतकर्‍यांना बँकांचे कर्ज फेडायचे असल्याने बाजारात आवक वाढली आहे.सोयाबीनचे दर शेतकर्‍यांच्या अपेक्षेपेक्षा कमी असले तर तुरीला मात्र कमी चांगले दर मिळत आहेत.

साडेआठ हजाराच्या आसपास गेलेल्या दरात आता किंचित घट झाली बाजारात आज तुरीला ७५५० ते ८३५० इतका दर मिळाला आहेराज्यात सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम सुरू झाला असून बहुतांश शेतकरी हार्वेस्टिंग मशीनने गहू काढून साठवणूक करण्या ऐवजी थेट बाजारात विक्री करत आहेत. गव्हाला सध्या १९५० ते २२५०रुपये दर मिळत आहे.

राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना देखील अपेक्षेप्रमाणं दर मिळालेला नाही. शेतकर्‍यांनी कापसाला दहा हजारांपेक्षा जादा दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, कापसाचे वायदे सुरु होऊन देखील कापसाच्या दरात हवी तेवढी वाढ झालेली नाही. कापसाचे दर साडे आठ हजारांच्या दरम्यान आहेत. दुसरीकडे हरभर्‍याचे बाजारातील दर पडल्यानं शेतकर्‍यांकडून हमीभावानं विक्री करण्यास प्राधान्य दिलं जात आहे.