क्राईम

जम्पिंग प्रमोशनची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे !

अकोला : अकोला महानगरपालिका सन २००९ व २०१२ साली झालेल्या जंपींग प्रमोशनप्रकरणी शासन दरबारी वारंवार तक्रारी देवून सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्या या जाचाला कंटाळून तक्रारकर्त्याने कायद्याचा आधार घेत सीआरपीसी १९५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची परवानगी मिळविण्याकरिता मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे अर्ज दि. ५ जानेवारी २०२३ रोजी दाखल केला होता.

या अर्जानुसार ६०. दिवसामध्ये कार्यवाही करुन तसा कार्यपालन अहवाल मुख्यमंत्री कार्यालय व तक्रारकर्त्याला देणे आवश्यक असतांना ६० दिवसांचा कालावधी हा ५ मार्च रोजीच संपुष्टात आल्याने शासन स्तरावर कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे अखेर तक्रारकर्त्याला कायद्याचा आधार घेणे क्रमप्राप्त ठरत असल्यामुळे तक्रारदार आता दिवाणी न्यायालयामध्ये संपूर्ण प्रकरण दाखल करणार असून त्यानुसार आता थेट गुन्हे दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना व स्थानिक पोलीस ? स्टेशनला असावी याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक सिटी कोतवाली यांना आज दि. १३ मार्च २०२३ रोजी दिली आहे.

त्यानुसार महालेखाकार, नागपूर, अध्यक्ष लोकलेखा समिती मुंबई तथा मनपा आयुक्त यांच्यासह जंपीग पदोन्नती घेतलेल्या सन.२००३ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्‍यांवर कार्यवाही करण्याकरिता तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती तक्रारकर्ते सुनील इंगळे यांनी दिली आहे व ते दि.१४ मार्च रोजी कलम १५६/३ नुसार जंपीग प्रकरणबाबत न्यायालयात प्रकरण दाखल करणार न्यायालच्या निर्देशानुसार आता लवकरच गुन्हे दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.