क्राईम

गावठी दारूची निर्मिती करणारा एक वर्षांसाठी स्थानबद्ध

  • अकोला प्रतिनिधी ९आँँ:पातूर तालुक्यातील मौजे पास्टुल येथील गावठी दारू निर्मिती करणाऱ्याला एक वर्षासाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजे पास्टुल येथील रहिवासी निरंजन उर्फ उमेश महादेव ठाकरे वय २४वर्षे, याच्यावर अवैध रित्या गावठी दारूची निर्मिती करणे,त्या दारूची अवैध रित्या वाहतूक करणे,विक्री करणे,यासह त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत.त्याच्या गुन्हेगारी कृत्याला आळा घालण्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधक कायद्याखाली कारवाया केल्या, त्याला तडीपार सुद्धा करण्यात आले, परंतु उमेश ठाकरे हा वेळोवेळी कायद्याचे उल्लंघन करीत,त्याच्यावर केलेल्या कारवाईला जुमानत नव्हता, त्यामुळे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नमूद इसमाचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून, अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे स्रोत वापरून प्रस्तावाची खात्री करून,९ ऑगस्ट रोजी मान्यता दिली. त्यावरून अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी उमेश ठाकरे याला ताब्यात घेऊन, त्याची अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.ही कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक हरीश गवळी,पोलीस उपनिरीक्षकअमोल गोरे पो. कॉ. मंगेश महल्ले,पातूर पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी मोलाची कामगिरी बजावली.