अकोला

गवळीपुरा-तपे हनुमान मार्गावरील अतिक्रमण हटवले

अकोला : मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने गवळीपुरा-तपे हनुमान मार्गावरील रस्त्याच्या वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणाचा सफाया केला. दरम्यान नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी रस्त्यालगत अतिक्रमण करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

मनपाच्या वतीने पुन्हा धडक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. अतिक्रमणाला आळा बसावा, या हेतूने ही मोहीम दररोज विविध मार्गावर राबवली जात आहे. गुरुवार, १६ मार्चला अतिक्रमण हटाव पथकाने होमिओपॅथी मेडिकल कॉलेज ते अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती ते गवळीपुरा ते तपे हनुमान या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.

रस्त्यालगत लावलेले टिनशेड, ताट्या, चहाची दुकाने, पानपट्टी आदींचा सफाया केला.ही कारवाई अतिक्रमण विभागाचे सहायक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाडे, सै. रफिक, योगेश कंचनपुरे, स्वप्निल शिंदखेडकर, गुलाम मुस्तफा, अब्दुल राजीक, शोभा इंगळे, सविता सगळे, स्वप्निल पवार, धीरज पवार, पवन चव्हाण, सोनू गायकवाड, मनपा विद्युत विभागाचे विजय यादव, महेंद्र रोकडे, हरिहर घोडके, मनोहर मसके, गजानन मेंगे, गजानन बोरडे व अभिकर्ताचे अजिंक्य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सूरज लोंढे, नितीन सोनोने आदींनी केली.