अकोला

खाजगी वाहनात औषध विक्री करण्यासाठी नेल्या प्रकरणी चौकशीला सुरुवात

आलेगाव : पातुर तालुक्यातील मळसूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध व इतर साहित्य विक्री करण्यासाठी खाजगी वाहनाद्वारे नेण्याचा प्रयत्न फसल्याची घटना रविवार रोजीच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने एकाच खडबड उडाली आहे.

सोमवार रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी विजय जाधव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन चौकशीला सुरुवात केली, मळसूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील गोरगरिबांसाठी वापरण्यात येणारी औषध व साहित्य रविवार रोजीच्या रात्री ८ वाजता खाजगी वाहनात भरून विक्री करण्यासाठी नेताना खाजगी इनोवा मळसूर चान्नी मार्गवरील चान्नी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार जितेश कानपुरे आपल्या कर्मचाऱ्यासह आलेगावहुन चान्नीकडे येत असताना संशयस्पद वाहन आढळून आले होते, वाहन थांबून विचारपूस केली असता, चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ठाणेदाराचा संशय वाढला, चौकशी केली असता, खाजगी वाहनात औषध व रुग्णालयातील साहित्य असल्याचे आढळून आले.

ठाणेदारांनी वैद्यकीय अधिकारी यांच्याशी विचारणा केली असता, मला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले पोलिसांनी वाहन प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा केले, नियमानुसार शासकीय रुग्णालयातील औषध व साहित्य आणणे किंवा मुदत संपलेली औषध पाठविण्याचे काम १०२ ची रुग्णवाहिकेतूनच कार्यालयीन वेळेत करावे लागते, परंतु रात्रीच्या वेळेस खाजगी वाहनात औषध व साहित्य विक्रीसाठीच नेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जाधव कसून चौकशी करीत आहे. चौकशी दरम्यान गावकऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

मो.इमरान