वाशिम

एक हजाराची लाच घेताना, कंत्राटी तांत्रीक साह्ययकास अटक! 

वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई!
अकोला प्रतिनिधी१०डिसेंबर:-रेशन कार्डाची तृतीय प्रत मिळून देण्यासाठी, वाशिम तहसील कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकास १हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.भागवत कैलास चौधरी वय२५वर्षे, असे अटक करण्यात आलेल्या कंत्राटी सहाय्यकाचे नांव आहे.याबाबत थोडक्यात हकीकत अशी आहे की,या प्रकरणातील तक्रारदार यांना त्यांच्या आईच्या नांवाने असलेल्या, रेशनकार्डाची तृतीय प्रत हवी होती, तशा प्रकारचा अर्ज,तक्रारदार यांनी वाशिम तहसील कार्यालयात दाखल केला होता. परंतु कंत्राटी तांत्रिक सहाय्यक भागवत कैलास चौधरी याने रेशन कार्डाची तृतीय देण्यासाठी तक्रारदार यांना एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी ७डिसेंबर२०२१रोजी  केली होती. लाचेची रक्कम देण्याची नसल्याने, नमूद तक्रारदार यांनी भागवत कैलास चौधरी याची तक्रार, वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  केली, वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांनी संबंधित तक्रारीची पडताळणी, त्याच दिवशी अर्थात७डिसेंबर रोजी करून,९डिसेंबर रोजी सरकारी पंचा समक्ष सापळा रचला. आणि वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरात येत असलेल्या ,सखी कलेक्शन अँड लेडीज गारमेंट समोर,लाचेची१ हजार रुपयांची रक्कम घेतांना भागवत चौधरी याला रंगेहाथ अटक करून, त्याच्या विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या आदेशानुसार वाशिम जिल्ह्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ममता अफूने,पो. हे.कॉ. नितीन टवालकर,असिफ शेख, रमेश बोडखे, पोलिस नायक अरविंद राठोड,योगेश खोटे यांनी केली.