I-Prem-u-Marathi-Movie
मनोरंजन

‘आय प्रेम यु’ १७ मार्चला चित्रपटगृहात

मुंबई : एका मुलीविषयी वाटणाऱ्या आपुलकीचं प्रेमात होणारं रुपांतर आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडींचं कलरफुल चित्रण असलेल्या आय प्रेम यु या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रेम याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू ‘आय प्रेम यु’ या चित्रपटातून पहायला मिळणार असून हा चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

“आय प्रेम यु” या चित्रपटाची निर्मिती साईश्री एंटरटेन्मेंटच्या मधुकर गुरसळ , नितीन कहार यांनी केली आहे. नितीन कहार यांनीच लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, संजू-संग्राम आणि यशोधन कदम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहार या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करत असून, कयादू आणि अभिजीत आमकर ही फ्रेश जोडी या चित्रपटात आहे.

एकतर्फी प्रेमाला मिळणारी वागणूक, त्यातून होणारे मनोव्यापार या ट्रेलरमधून पाहायला मिळतात. कलरफुल आणि म्युझिकल अशी ही प्रेमकथा ट्रेलरमधूनच लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती चित्रपटाला चित्रपटगृहात मिळेल यात शंका नाही.