क्रीडा

आकोटच्या दिव्यांग धीरजची विक्रमी कामगिरीङश्रीनगर ते कन्याकुमारी ३६५१ कि. मी. अंतर सायकलने १२ दिवसात केले पूर्ण

अकोट: महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवाशी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक धीरज बंडू कळसाईत याने काश्मिर ते कन्याकुमारी सोलो सायकलींग मोहिम फत्ते केली आहे. २५ वर्षीय धीरज ने आपल्या दुर्दम्य इच्छा शक्ति, जिद्द, चिकाटी च्या बळावर ३६५१ कि.मी. अंतर अवघ्या १२ दिवसात गाठले आहे.

धीरज च्या या विक्रमी कामगिरीमुळे सायकलिंग क्षेत्रात महाराष्ट्राचा नांव लौकिक वाढला आहे. एक हात व पाय नसतांनाही अशी साहसिक सायकलिंग स्पर्धा पूर्ण करून धीरजने नवा विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्याने सांगितले.

या सायकलिंग स्पर्धेव्दारा धीरजने दिव्यांग की दिव्यदृष्टी तन से ज्यादा मन की शक्ति आणि आत्मनिर्भर भारत चा संदेश दिला. श्रीनगर ते कन्याकुमारी रेस अक्रॉस इंडीया या आशियातील सर्वांत लांब अंतराच्या स्पर्धेत श्रीनगर येथील लाल चौकातून १ मार्च रोजी सकाळी धीरजने सायकलिंग सुरू केली. भारतातील जवळपास १२ राज्य व महत्वाच्या २५ शहरांमधून धीरजने मार्गक्रमण केले.

सायकलींग दरम्यान आलेल्या अडथळ्यांना तोंड देत १३ मार्च रोजी सकाळी धीरजने कन्याकुमारी गाठले. दरम्यान अनेक शहरांमध्ये नागरिकांनी धीरजचे स्वागत करून त्याचा उत्साह वाढविला. त्याने आर्थिक संकटाला तोंड देत बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले आहे. धीरज ला जन्मापासून डावा हात मनगटापासून नाही तर काही वर्षांपूर्वी अपघातात त्याचा एक पाय निकामी झाला आहे. त्याला कृत्रिम पाय लावण्यात आला आहे.

अडथळ्यांना तोंड देत पूर्ण केले स्वप्नङभारतातील वेगवेगळ्या राज्यातून सायकलिंग करतांना कधी गारठून टाकणारा वारा, कधी तीव्र ऊन, कधी पाऊस अशा विपरीत वातावरणाला तोंड देत रात्रंदिवस मेहनत घेऊन अखेरीस धीरजने १२ दिवसात कन्याकुमारी गाठले. शिवाय कधी पायाचे दुखणे, कधी सायकल पंचर व इतर बिघाड होणे असे अडथळे आलेत. सायकलिंग दरम्यान अनेक अडथळ्यांची शर्यत धीरजला पार करावी लागली.

केवळ काही तास झोप घेऊन धीरने दररोज ३०० कि. मी. पेक्षा जास्त अंतर सायकल चालविली. हे करत असतांना त्याने अक्षरश: आपल्या शारिरीक क्षमता़ंना आव्हान देत तन से ज्यादा मन की शक्ति या उक्तीचा परिचय दिला. या सायकल स्पर्धेत धीरज सोबत सहाय्यतेकरिता टिम लिडर म्हणून राजीक अली याचेसह अर्चना गडधे, विशाल सुभेदार व प्रफुल्ल गिरी हे होते.

धीरजच्या या मोहीमेत लोकजागर मंच सह अनेक शहरातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देत धीरजच्या स्वप्न पूर्ततेकरिता सहकार्य केले आहे. धीरजने यापूर्वी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईसह इतर शिखर, गड-किल्ले सर केले आहेत.

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक म्हणून धीरजने २०१९ मध्ये रशिया मधिल हिम शिखर माऊंट एल्ब्रुज व दक्षिण ऑप्रâीकेतील माऊंट किलीमंजारो हे हिमशिखर सर करुन भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला आहे. राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम दर्शविणार्‍या धीरजच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे.