अमरावती

अमरावती जिल्ह्यात दोन दिवसात कोरोनाचे 14 नवे रुग्ण

अमरावती, 20 मार्च : अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूचा धोका पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसात कोरोनाचे एकूण १४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना सक्रिय रुग्णसंख्या ही ४१ इतकी झाली आहे. एच थ्री एन-टू एन्फ्लूएंझाचे दोन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ही पाचवर पोहोचली आहे. या दोन्ही संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे..

जिल्ह्यात सध्या वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढल्याने सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. घरोघरी सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. यातच जिल्ह्यात एच-श्री एन-टू आजाराचाही शिरकाव झाला असून रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. मागील वर्षभरात कोविड रुग्णांची संख्या कमी होऊन शून्यावर पोहोचल्यानंतर आरोग्य प्रशासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या फेज-२ इमारतीचा कोविड वॉर्ड बंद केला. परंतु आता पुन्हा एका कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. दोन दिवसात जिल्ह्यात १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १८ मार्चला ८, तर १९ मार्चला ४२ पैकी ६. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती विद्यापीठ प्रयोगशाळा प्रमुख प्रशांत ठाकरे यांनी दिली.

कलर बॉक्सइर्विनच्या वॉर्ड क्र.१० मध्ये आयसोलेशन वॉर्ड कोरोना व एच थ्री एन-टू रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालयात (डविन) वॉर्ड क्र. १० मध्ये बारा खाटांचे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले. याठिकाणी एच थ्री एन-टू पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात आले आहे. तर कोरोना रुग्णांची लक्षणे ही सौम्य असल्याने ती गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.