देश

अमरावती(बेलोरा)विमानतळाच्या विकासासाठी५०कोटी रुपये निधी मंजूर!

खासदार नवनवीन राणा आणि आमदार रवी राणा यांच्या पाठ पुराव्याला यश!
अकोला ४सप्टेंबर:-अमरावती(बेलोरा) विमानतळाच्या विकासासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंंधिया यांनी ५०कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, या विमानतळाच्या विकास होऊन, या विमानतळावरुन विमानसेवा सुरू व्हावी ही मागणी अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवणीत राणा यांनी लावून धरली होती. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी५०कोटी निधी मंजूर केला आहे. यामुळेआता लवकरच बेलोरा विमानतळाचे उर्वरित काम मार्गी लागणार,धावपट्टी,टर्मिनल इमारत,प्रवासी सुविधा आवागमन कक्ष,नाईट व्हिजन सिस्टिम,(सांयकाळ नंतर विमान वाहतुकासाठी), पार्किंग झोन,आदी सुविधा निर्माण होऊन अमरावती मुंबई-मुबंई अमरावती विमानसेवा प्रारंभ होणार आहे.ही विमान सेवा सुरू झाल्याने अमरावती जिल्ह्याच्या औद्योगिक-, व्यावसायिक,शैक्षणिक व पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
 विदर्भाचे नंदनवन चिखलदरा हे पर्यटन स्थळ आता जागतिक व राष्ट्रीय पर्यटकांना आवगमनास सोयीचे होणार आहे.
अमरावतीच्या खासदार सौ नवनीत रवी राणा व  बडनेरा चे कर्तव्यदक्ष आमदार रवी राणा हे “जिल्ह्याचा विकास व्हावा-सुरू व्हावी विमानसेवा”या ध्येयाने बेलोरा विमानतळाचा विकास व्हावा व येथून विमान उड्डाण सुरू होऊन अमरावती जिल्हा देशाच्या हवाई नकाशावर यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करीतहोते.
   ४ऑगस्ट रोजी खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री  ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन बेलोरा विमानतळाच्या उर्वरित अत्यावश्यक विकासकामाची पूर्तता करण्यासाठी ५० कोटी रुपयांची मागणी केली होती.अमरावती हे ५ जिल्ह्याचे मुख्यालय असून,महानगरपालिका आहे,अमरावती हे विदर्भाचे शैक्षणिक व सांस्कृतिक माहेरघर समजल्या जाते,या जिल्ह्यात आई अंबा एकविरा देवीचे मंदिर,हिल स्टेशन चिखलदरा,मेळघाट टायगर प्रोजेक्ट, महानुभाव पंथीयांची काशी असणारे रिद्धपुर,जैन बांधवांचे तीर्थक्षेत्र मुक्तगिरी,तुकडोजी  महाराजांची कर्मभूमी मोझरी, गाडगेमहाराजांची जन्मभूमी व निर्वाणभूमी,जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक  मंडळ आदी प्रसिद्ध
ठिकाणे असून,नांदगावपेठ येथे पंचतारांकित एम.आय.,डी.,सी,असून अमरावतीचा  कपडा व्यापार हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे,अशा या अमरावती जिल्ह्याला हवाई वाहतुकीची नितांत गरज असून या बेलोरा विमानतळाचा फायदा लगतच्या अकोला,यवतमाळ व वाशीम,बुलढाणा जिल्ह्याला सुद्धा होऊ शकतो हे खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केंद्रीय मंत्री  ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या लक्षात आणून दिले व बेलोरा विमानतळ विकासासाठी ५० कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले.याची दखल घेत
  केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री  ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दोघांचेही म्हणणे गांभीर्याने ऐकून घेऊन तात्काळ ५० कोटींच्या निधीला मंजुरात दिली.या निधीमुळे आता बेलोरा विमानतळाचा रखडलेला विकास मार्गी लागणार असून अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंग,उत्कृष्ट दर्जाची धावपट्टी,रात्रकालीन विमान वाहतुकीसाठी नाईट व्हिजन लँडिंग सिस्टम,पार्किंग सुविधा,कॅफेटोरिया आदी बाबी पूर्णत्वास जाणार असून बेलोरा विमानतळावरून सर्वप्रथम अमरावती-मुंबई,मुंबई-अमरावती अशी नियमित हवाई सेवा सुरू होईल.व्यापारी,उद्योजक, शेतकरी,पर्यटक,आदींना आता अवागमन करणे सोपे होईल ज्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक-व्यापारी-शैक्षणिक-,कृषी ,पर्यटन विकासाला गती मिळेल व जिल्ह्यात रोजगार निर्मिती वाढून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल,आणि आपला अमरावती जिल्हा हा देशाच्या हवाई नकाशावर येईल असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला व केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल अमरावती जिल्ह्यावासीयांच्या वतीने खासदार  नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी त्यांचे आभार मानले आहे.