Lalit-Nagrale
अकोला

अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकर्‍यांच्या खात्यात त्वरीत जमा करावी – ललित नगराळ

अकोट : शेतकरी हा दिवसेंदिवस नाडल्या जात आहे.महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर सरकार कडून शेतकर्‍याला नुकसान भरपाई मिळेल अशी आशा होती. परंतू अद्यापही शेतकर्‍यांना शासनाकडून एक रुपयाची देखील मदत मिळाली नाही. यावरुन शेतकरी हा शेतात राबराब राबतो, मशागत करतो व आपल्याला अन्न पुरवितो त्याच शेतकर्‍यांची शासन दरबारी दखल घेतली जात नाही. शासनाने घोषणा करुन सुध्दा अजून पर्यंत शेतकर्‍यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत.

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई च्या रुपात दिसणारा आशेचा किरण देखील नाहीसा होत चालला आहे.अतिवृष्टीमुळे कापूस, मूग, उडीद, सोयाबीन,ज्वारी यासह संत्रा व केळी उत्पादक शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्याची नुकसान भरपाई केव्हा मिळेल.त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांच्या बाबतीत निर्णय घेताना अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकर्‍यांच्या खात्यात त्वरीत जमा करावी अशी मागणी ललित नगराळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.