मुंबई दि.30- वंचित बहुजन आघाडीचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह रिपब्लिकन पक्षात(आठवले) आज जाहिर प्रवेश केला. आज बांद्रा येथील जनसंपर्क कार्यालयात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे शुभआर्शिवाद घेऊन प्रकाश अहिरे यांनी रिपब्लिकन पक्षात जाहिर प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देऊन रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्याबद्दल प्रकाश अहिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)या पक्षात प्रवेश केलेले वंचित बहुजन आघाडीचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष
जगन्नाथ सरोदे, जिल्हा सहसचिव अनिल रामभाऊ ससाणे, सचिव सिध्दार्थ खरात, प्रशांत तायड, सुर्यकांत बानाटे, सुभाष कदम आदि प्रमुख कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोडुन रिपब्लिकन पक्षात जाहिर प्रवेश केला.
उत्तर मुंबई मध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात प्रवेश केल्याने उत्तर मुंबईत रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढली आहे.
उत्तर मुंबईत या पक्ष प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी खिंडार पडले आहे अशी उत्तर मुंबईत चर्चा सुरु आहे.सर्व सामान्य जनतेला न्याय देणारे आणि सामान्य कार्यकर्त्यांला सत्तेत सहभाग देऊन त्याला ताकद देणारे रामदास आठवले खरे लोकनेते आहेत.त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपल्य समर्थकांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्याचे मनोगत प्रकाश अहिरे यांनी व्यक्त केले.