मुंबई

मुंबईच्या आयएएस अधिकारी पुजा खेडकरच्या आयुक्त नामाचा वापर, प्रमाणपत्रंही बनावट

मुंबई – खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पुजा खेडकरचे आणखीच कारनामे समोर आले आहेत. त्यातच ओबीसीमधून युपीएससीचा अर्ज दाखल करताना उत्पन्नासंबंधी दिलेल्या माहितीने पुजा खेडकरचा पाय आणखीच गाळात रू तला आहे.त्यामुळेच पुजा खेडकरची नियुक्ती वादात सापडली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएएस म्हणून काम करत असताना पुजा खेडकरने आपल्या खासगी अलिशान ऑडी गाडीवर लाल दिवा लावला होता. तसंच स्वतंत्र केबिन, शिपाई आणि ड्रायव्हरसाठीही तिने हट्ट केला होता. त्याबरोबरच तिचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांची अधिकाऱ्यांना दमबाजी यामुळे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी पुजा खेडकरचा प्रोबशन काळ संपवून त्यांना दुसरीकडे बदली देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर पुजा खेडकरचे कारनामे समोर यायला सुरुवात झाली. एवढंच नाही तर पुजा खेडकरला १७ कोटींच्या मालमत्तेतून ४२ लाखांचं उत्पन्न मिळते. तर वडीलांच्या नावावर ४० कोटींची मालमत्ता आहे.

त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून युपीएससीला अर्ज भरताना ८ लाख रुपयांची नॉन क्रिमीलेअर मर्यादा असतानाही कोट्यावधींची संपत्ती असलेल्या पुजा खेडकरने चुकीची माहिती देऊन आयएएसपदी नियुक्ती मिळाल्याचंही समोर आले आहे. खासगी गाडीवर दिवा लावण्यावरून सुरु झालेल्या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यातच सरकारची फसवणूक करून पुजा खेडकरने नियुक्ती मिळवल्याचंही समोर आले आहे. त्यामुळे पुजा खेडकरला देशाच्या सर्वोच्च परीक्षेत हेराफेरी करण्यासाठी नेमकी कुणी मदत केली? पुजा खेडकरवर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? हे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.