पातुर – स्थानिक शाहबाबू उर्दू प्राथमिक, हायस्कूल व ज्यु. कॉलेज पातूर येथे शिक्षण सप्ताह निमित्ताने पूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने दि. 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यासंबंधीचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार दि 22 जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस दि. 23 जुलै रोजी मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, 24 जुलै रोजी क्रिडा दिवस, 25 जुलै रोजी सांस्कृतीक दिवस 26 जुलै रोजी कौशल्य व डीजीटल उपक्रम दिवस, 27 जुलै रोजी मिशन लाईफ च्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम / शालेय पोषण दिवस या सर्वच उपक्रमांच्या अंतर्गत बऱ्याच कृत्या व प्रकल्प राबविण्यात आले.
तर सप्ताहाच्या शेवटी 28 जुलै रविवार रोजी समुदाय सहभाग दिवसच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात तिथी भोजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. ज्यामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा, पालक समुदायाचा, विद्यार्थ्यांचा, शिक्षण विभागाशी संबंधीत पंचायत समितीच्या अधिकार्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तिथी भोजनापूर्वी आयोजित कार्यक्रमात कटरे साहेब, चिकटे, संतोष राठोड,केंद्र प्रमुख सैय्यद माजिद हुसैन,श्रीमती आरती धोटे आवर्जुन उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण प्राप्त करून समाजोद्धारासाठी झटण्याचे आव्हान सै इसहाक राही सरांनी केले. प्राचार्य मुजीबउल्ला खान यांच्या आदेशानुसार सर्व उपक्रम प्रभारी व शिक्षकांनी हा शिक्षण सप्ताह यशस्वी होण्यासाठी कार्य केले. कार्यक्रमाचे संचालन मो नातीक सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रेहान अहमद यांनी केले.