आंतरराष्ट्रीय

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा हिरा सापडला

बोत्सवाना – तब्बल अर्धा किलो असलेला हा हिरा २ हजार ४९२ कॅरेटचा आहे. १९०५ साली दक्षिण अफ्रिकेमध्ये मिळालेल्या ३ हजार १०६ कॅरेटचा कॅलिनन हा हिरा आजवरचा सर्वात मोठा हिरा आहे. त्यानंतर तब्बल ११९ वर्षांनी हा हिरा सापडला आहे. याआधी २०१९ मध्ये याच खाणीतून काढलेला १,७५८ कॅरेटचा हिरा हा दुसऱ्या क्रमांकाचा हिरा समजला जात होता. आता दक्षिण अफ्रिकेच्या बोट्सवाना देशात जगातील दुसऱ्या सर्वात मोठा हिरा सापडला आहे.

कॅनडाच्या लुकारा डायमंड या खाण कंपनीला कारोवे येथील खाणीत हा हिरा मिळाला आहे. या हिऱ्याचा शोध घेताना त्यांनी एक्स रे तंत्राचा वापर केला होता. हा हिरा फ्रान्सच्या लुई विटॉन या फॅशन कंपनीने विकत घेतला असून त्याची किंमत मात्र उघड करण्यात आलेली नाही. कारोवे येथील हिऱ्याच्या खाणीतून आतापर्यंत १ हजार कॅरेट पेक्षा अधिक असे ४ हिरे काढण्यात आले आहेत. १९०५ सालच्या जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याचा एक तुकडा ब्रिटनच्या राजदंडामध्ये वापरण्यात आला असून दुसरा मोठा तुकडा राणीच्या मुकुटात आहे.