पातूरच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाची जिल्हास्तरावर निवड
पातुर : तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2024 25 तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांच्या प्रेरणेने व जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. ह्या नाट्योत्सवात तालुक्यातील पाच शाळांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी सावित्रीबाई फुले विद्यालय पातुर यांनी प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे या शाळेची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती पातुर चे विस्ताराधिकारी प्रवीण डाबेराव व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रविंद्र भास्कर यांची उपस्थिती होती . परीक्षक म्हणून विज्ञान शिक्षक रमेश पवार व पत्रकार देवानंद गहिले यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. ह्या पातुर तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सवाचे आयोजन व नियोजन पातुर तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष सुनील वावगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. नाट्यउत्सवाच्या यशस्वीतेसाठी गट साधन व्यक्ती राजेंद्र कटरे सर, विज्ञान शिक्षक दिनेश करोडदे , बिपीन पवार यांनी सहकार्य केले.
या नाट्य उत्सवात सावित्रीबाई फुले विद्यालय पातुर यांना विजय घोषित करून या शाळेची जिल्हास्तरीय नाट्य उत्सवासाठी निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अनिल चिकटे विषय साधन व्यक्ती पं स.पातूर यांनी केले, तर आभार प्रकाश खटे विषय साधन व्यक्ती पं. स पातूर यांनी मानले.