करिअर

विद्यार्थी विज्ञान मंथनमध्ये प्रभातच्या अनन्याची राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड

२५ डिसेंबर अकोला : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी विद्यार्थी विज्ञान मंथन ह्या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर करण्यात येते. यामध्ये प्रभात किड्स स्कूलची अनन्या ठाकरे हिची राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड झाली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन दि. १७ डिसेंबर रोजी शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे करण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावरील फेरीमध्ये प्रणिल नावकार (वर्ग ८), आदित्य गुरुदासानी (वर्ग ७), अनन्या ठाकरे (वर्ग ६) व आदित्य मंत्री (वर्ग ६) या विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले. त्यामध्ये अनन्या संजय ठाकरे हिने प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय फेरीमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

तसेच आदित्य दिनेश मंत्री ह्याने तृतीय क्रमांक पटकावून यश संपादीत केले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रभातच्या शैक्षणिक समन्वयक व विज्ञान शिक्षीका स्नेहल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे व उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.