Sangh chief Dr. Bhagwat casted his vote in Nagpur
नागपूर

संघाचे प्रमुख डॉ. भागवत यांनी नागपुरात केले मतदान

नागपूर, 20 नोव्हेंबर :  महाराष्ट्रात आज लोकशाहीचा सर्वात मोठा सण साजरा होत आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणुका होत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज सकाळी ७ वाजता नागपुरातील महाल येथील भाऊजी दफ्तरी शाळेच्या बुथवर मतदान केले.

महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व २८८ जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कुटुंबासह मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केले. जनतेने घराबाहेर पडून मतदानाची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. अभिनेते अक्षय कुमार आणि राजकुमार राव यांनीही मतदान करून उत्सवात सहभाग घेतला.