ताज्या बातम्या राजकीय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढणार?

नागपूर 5 जानेवारी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांनी दिलेला शब्द पाळला नाही,होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये सन्मान पूर्वक वाटा मिळाला नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी नागपूर येथे रवी भवन पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.

विधान सभेच्या निवडणुकीला जनता महाघाडीच्या अपप्रचाराला बळी न पडता,सर्व जनतेने आणि लाडक्या बहनी यांनी मतदान करून महायुतीला 237 जागा देऊन, महायुतीला सरकार स्थापन करण्यात आले.महायुतीचे सरकार जनतेच्या हिताचे काम करून दलितांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून न्याय देतील.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून, नक्षलवादी सरकारला शरण येत आहेत, नक्षलवादी यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आव्हान ना.रामदास आठवले यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी पूर्वी एक विधान परिषद आणि एक मंत्री पद देण्याचे कबूल केलं होतं, परंतु दिलेला शब्द पाळल्या नसल्यामुळे मी आणि माझे कार्यकर्ते नाराज असल्याची खदखद व्यक्त केली.

परभणी येथे झालेल्या पोलीस कारवाई वर रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. पोलीस कोठडीत सोमनाथ सुरवंशी यांचा मृत्यू झाला,त्याची योग्य चौकशी करून, दोषी पोलिसांवर कारवाई करून, सोमनाथच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत रुजू करण्यासाठी प्रयत्न करावेत, मसजोगाच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या वाल्मिक कराड आणि इतर सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी,अशी मागणी सुद्धा पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी केली.

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी धनंजय मुंडे संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता,धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणी करणे योग्य नाही,असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

अमित शहा यांच्या संसदेत केलेल्या विधानाचा विपर्यास केला आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा दिल्या जात नसतील तर,निवडणुका स्वबळावर निवडणुका लढणार आहोत.आज आयोजीत करण्यात आलेली बैठक पक्ष बांधणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी करण्यासाठी होती असे ,पत्रकारांना सांगितले.या पत्रकार परिषदेला अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार, विदर्भ अध्यक्ष विजय आगलावे, गौतम सोनवणे, दयाल बहादूर, भीमराव बन्सोड, बाबू कदम, सुधाकर तायडे, राजन वाघमारे, प्रकाश गजभिये, मोहन भोयर, विनोद थुल, बाळासाहेब घरडे, डॉ मनोज मेश्राम, अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार, जे पी सावंग, जुगलकिशोर जामाणिक, अजय प्रभे, दिनेश पेटकर, दयानंद टेलगोटे,पंडित सदार, श्रावण सोनोने, बाळू इंगळे उपस्थित होते.