संपादकीय

महाराष्ट्र निवडणूक : बौद्ध उमेदवारा विषयी आकस, संशय, संभ्रम, भिती, पुर्वग्रह या बाबत वास्तव आणि विपर्यास….!

महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूका साधारण येत्या नोव्हेंबर 2024 मध्ये होतील. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 सदस्य संख्येत अनुसूचित जाती (SC) 29 तर अनुसूचित जमाती (ST) 25 असे एकूण फक्त 54 मतदार संघ हे राखीव आहेत.

महाराष्ट्र विधानसभेसाठी अनुसूचित जाती करीता राखीव मतदार संघ पुढील प्रमाणे आहेत.

1) भुसावळ (12) [ लोकसभा क्षेत्र – रावेर ]
2) मेहकर (25) [ लोकसभा क्षेत्र – बुलढाण ]
3) मुर्तिजापूर (32) [ लोकसभा क्षेत्र – अकोला ]
4) वाशिम (34) [ लोकसभा क्षेत्र – यवतमाळ, वाशिम ]
5) दर्यापूर (40 ) [ लोकसभा क्षेत्र – अमरावती ]
6) उमरेड (51) [ लोकसभा क्षेत्र – रामटेक ]
7) नागपुर उत्तर (57) [ लोकसभा क्षेत्र – नागपूर ]
8) भंडारा (61 ) – [ लोकसभा क्षेत्र – भंडारा, गोंदिया ]
9) अर्जुनी मोरगाव (63) [ लोकसभा क्षेत्र – भंडारा, गोंदिया ]
10) चंद्रपूर (71) [ लोकसभा क्षेत्र-चंद्रपूर ]
11) उमरखेड (82) [ लोकसभा क्षेत्र – हिंगोली ]
12) देगलूर (90) [ लोकसभा क्षेत्र – नांदेड ]
13) बदनापूर (102) [ लोकसभा क्षेत्र – जालना ]
14) औरंगाबाद पश्चिम (108) [ लोकसभा क्षेत्र – औरंगाबाद ]
15) देवळाली (126) [ लोकसभा क्षेत्र – नाशिक ]
16) अंबरनाथ (140) [ लोकसभा क्षेत्र – कल्याण ]
17) कुर्ला (174) [ लोकसभा क्षेत्र – मुंबई उत्तर मध्य ]
18) धारावी (178) [ मुंबई दक्षिण मध्य ]
19) पिंपरी (206) [ लोकसभा क्षेत्र – मावळ ]
20) पुणे कॅन्टोन्मेंट [ लोकसभा क्षेत्र- पुणे ]
21) श्रीरामपूर (220) [ लोकसभा क्षेत्र -शिर्डी ]
22) केज (232) [लोकसभा क्षेत्र -बीड ]
23) उदगीर (237) [ लोकसभा क्षेत्र – लातूर ]
24) उमरगा (240) [ लोकसभा क्षेत्र-उस्मानाबाद ]
25) मोहोळ (247) [ लोकसभा क्षेत्र – सोलापूर ]
26) माळशिरस (254) [ लोकसभा क्षेत्र – माढा ]
27) फलटण (255) [ लोकसभा क्षेत्र – माढा ]
28) हातकणंगले (278) [ लोकसभा क्षेत्र – हातकणंगले ]
29 ) मिरज (281) [ लोकसभा क्षेत्र – सांगली ]

महाराष्ट्रतल्या या 29 राखीव जागेवर तब्बल 16 आमदार चर्मकार समाजाचे तर 9 आमदार हे बौद्ध समाजाचे निवडूण आले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येच्या 11.81% लोकसंख्या अनुसूचित जातींची आहे. महाराष्ट्रात अनुसूचीत जाती या 59 आहेत. या अनुसूचित जातीत सर्वात मोठी लोकसंख्या ही बौद्ध/ महार जातीची आहे.

महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती या 100 च्या पटीत ग्राह्य धरल्या तर 2001 च्या जनगणनेत महार जात ही 57.5 %, मातंग 20.3 % तर चर्मकार हे 12.5 % नोंदवले गेले आहेत. असे असताना बौद्ध / महार जातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सामाजिक/राजकीय न्याय मिळत नाही. सरकारी नोकरीतले आरक्षण असो की राजकारणातील लोकप्रतिनिधीचं आरक्षण असो शक्य तिथे बौद्ध / महार समाजाला डावलले जाते. निवडणूकीत अनुसूचित जातीत ज्यांची 12.5 % लोकसंख्या आहे त्या चर्मकार समाजाचे 29 जागेपैकी तब्बल 16 आमदार निवडूण येतात तर बौद्धांचे केवळ 9 जणच निवडूण येतात. हे नऊ जण बौद्ध बहुल भागातून निवडूण आलेले आहेत. प्रस्थापित पक्ष अगदीच नाइलाजाने त्यांना उभे करतो.

57.5% एवढी अनुसूचित जातीत प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या बौद्धांना प्रस्थापित पक्ष हे निवडणूकीत पुरेसे प्रतिनिधीत्व का देत नाहीत ?

बौद्धांचे पक्ष असणाऱ्या पक्षांनी प्रस्थापित पक्षांशी युती/ आघाडी केली तरी त्यांना जागाच सोडण्यात येत नाही ! का ??

चर्मकार समाजावरच हे प्रस्थापित पक्ष जादा मेहरबान का होतात.???
याचे कारण….

चर्मकार समाजावर खुपच प्रेम आहे व असते म्हणून नव्हे तर हा समाज ( किमान महाराष्ट्रातला )कधीही रस्त्यावर उतरून आंदोलन वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही.
आपण बरे आपले कुटुंब बरे असा स्वकेंद्रीत वृतीचा समाज असल्याने निवडूण आलेला उमेदवार. फार तर आपल्याच कुटूंबांची प्रगती साधेल मात्र संपूर्ण अनुसूचित जाती साठी कधीही संघर्ष करणार नाही.

याची खात्री असल्याने. निवडूण आलेला उमेदवार हा सवर्ण जातीच्या कुठल्या तरी प्रस्थापित नेत्यांच्या सल्ल्यानेच तो काम करील. म्हणजे त्याचा रिमोट हा सवर्ण नेत्याच्या हाती असेल.
तो हिंदुत्ववादी विचारधारेचे उल्लंघन कधी ही करणार नाही.

तो देवळाला, मंदिराला सवर्ण वस्तीत विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी देईल.
तो त्याच्या जातीचे वैयक्तीक संघटन बांधणार नाही.
तो स्वतःच्या नावाचे कुठलाही विचारमंच काढणार नाही.
तो तालुक्यात चालत आलेल्या राजकारणात हस्तक्षेप, ढवळाढवळ करणार नाही.
तो आमदार जरी झाला तरी सवर्ण व्यक्तींशी नम्रतापूर्ण व पायलागू भुमिकेतच राहिल.
तो आपल्या वारसाला राजकारणात येऊ देणार नाही.

या विषयी सवर्ण नेत्यांच्या व त्यांच्या प्रस्थापित पक्षांना खात्री असल्याने त्यांची अशा राखीव जागेवर पहिली पसंती ही चर्मकार समाजाचीच असते.
कितीही चांगला, गुणी, ज्ञानी, अनुभवी, हुशार असा बौद्ध उमेदवार निवडणूकीत उभा असला तर त्यास अभिजन सोडा बहुजन समाजातील मतदार ही मतदान करीत नाहीत आणि अनुसूचित जातीतल्या व्यक्तीही मतदान करीत नाहीत.
या मागचे कारण….

1) बौद्ध समाजाची अरेरावी वाढेल.

2) आपल्या समाजाचे महत्व कमी होईल.

3) बौद्ध समाजाची व्यक्ती जर का आमदार झालाच तर तो त्याला प्राप्त झालेल्या अधिकाराचा/ सत्तेचा पुर्ण वापर करेल म्हणजेच त्यांच्या भाषेत दुरुपयोग करेल.

4) बौद्ध समाजाविषयी चा आकस, संशय, संभ्रम,मनुवादी मानसिकता व पुर्वग्रह दुषीत नजर

या मुळे बौद्ध समाजाच्या उमेदवाराकडे एकंदरीत सर्वच तिरस्करणीय नजरेतून पाहतात.
अशी एकून परिस्थिती आहे. त्यामुळे एखाद्या बौद्ध व्यक्तीचे एखाद्या पाटील, देशमुख किंवा पंत अशा मातब्बर व्यक्तींशी घनिष्ठ संबंध असले आणि अशा सवर्ण नेत्यासाठी कितीही प्रचार केला, मारामाऱ्या केल्या तरी असे सवर्ण नेते बौद्ध व्यक्तीस शाबासकी देतील, थोडाफार मोबदला देतील, एखादे दुसरे छोटे मोठे काम करतील फारतर ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती ते जिल्हा परिषद इथपर्यंतच सिमीत ठेवतील मात्र चुकून ही आमदारकी/ खासदारकी साठी कदापी प्रयत्न करणार नाहीत. उलट कुठून मिळत असले तर ते हाणून पाडतील.

या वर उपाय….

  • जात व्यवस्थेचे बळी ठरलेल्या बौद्धांनी सवर्णांची वर्चस्ववादी मानसिका ही ओळखूनच “जात वास्तव” हे स्विकारलेच पाहिजे.
  • पुरोगामी विचारांचे बहुजनांतील नेतृत्वाचा शोध घेऊन त्याचेशी हातमिळवणी करावी, व्यावहारीक सौदा करावा.
  • आपण आपल्याच मतांवर निवडून येऊ शकत नाही इतर जाती धर्मांच्या मतांची ही निवडणूक जिंकण्यासाठी गरज भासते हे लक्षात घेऊन फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्याच नेत्याला मतदान करावे.
  • आपापले मत हे आपल्या अंतर्मनाचा कौल असतो. म्हणून क्रांती- प्रतिक्रांती, परिवर्तन अपरिवर्तन, समता- विषमता, गुलामी- मानवता, पुरोगामी- प्रतिगामी या बाबी, विचारसरणी ओळखून, जाणून मगच मतदान करावे.
  •  जशी जंगली हिंस्त्र प्राण्यांची खरी ताकद त्याच्या विखारी दातात व नखात असते तशी पुराणमतवादी, प्रतिगामी व जातंध्य, धर्मांध व्यक्तीकडे सत्ता आली तर तो जंगली जनावरा सारखा मुजोर व मस्तवाल बनणार असल्याने बौद्धांनी अशा नेत्यास व पक्षास सर्वसाधारण जागेत पराभूत करण्याचा प्रयत्न करावा. लक्षात घ्या आपणांस निवडूण येण्यासाठी त्यांच्या मताची आवश्यकता असते त्याच प्रमाणे सवर्णांनाही आपल्या मतांची गरज लागतेच
  •  जो काळासोबत पुढे जातो व जाता-जाता आपल्या सह सर्वच बहुजनांना मोठे करतो अशांनाच ओपन जागेसाठी बौद्धांनी मतदान करावे.
  • जो जात-पात, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, स्वधर्म- परधर्म असा भेदभाव करत नाही अशांनाच बौद्धांनी ओपन मधून लढणाऱ्या नेत्यास मतदान करावे.
  • जो गुन्हेगार प्रवृत्तीचा नाही अशा ओपन मधून निवडणूकीस उभा असलेल्या नेत्यासच बौद्धांनी मतदान करावे.
  • जो राजकारणात धर्म व धर्मात राजकारण आणत नाही अशा ओपन मधून निवडणूक लढविणाऱ्या नेत्यासच बौद्धांनी मतदान करावे.
  • लक्षात ठेवा, राजकारण ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. त्यात कधी शेवटचा दिवस व शेवटची खेळी नसते.

– सुनील अवचार,

जिल्हाध्यक्ष रिपाइं( आठवले)

अकोला जिल्हा.