अमरावती : अमरावती रोडवरील नेर पिंगळाई येथील शेतात भल्या मोठ्या अजगराने रोईच्या पिल्लूची शिकार केली. स्थानकीय शेतकरी यांना त्यांच्या झोपडी मध्ये अजगर जातीचा साप दिसल्या बरोबर त्यांनी मोर्शी येथील सर्पमित्रांना माहिती दिली. सर्पमित्रांनी त्या अजगराला सुरक्षित पकडून शिरखेड वन विभागाचे अधिकारी एफ.जी खेरकर यांच्या ताब्यात दिले.
माहिती नुसार नेर पिंगळाई येथील शेतात रोईच्या पिल्ल्याची शिकार करून शेतातील झोपडी मध्ये हा अजगर आढळून आला . स्थानकीय शेतकरी यांनी अजगर जातीचा साप दिसल्याने त्यांनी ताबडतोब सर्पमित्रांना बोलावले. सर्पमित्र प्रियांशु तायवाडे, रोहित अमझरे, विवेक सावरकर, राज कुरवाडे, सुरज धुर्वे, राहुल पंडागरे, यांनी त्वरित शेतात जाऊन अजगराला पकडले.सर्पमित्रांच्या कार्याबद्दल शेतकरी व स्थानिक लोकांनी त्यांचे अभिनंदन केले.