अकोला

भारतीय जनता पार्टी पातुर तालुका व शहर यांच्यावतीने निषेध आंदोलन

पातूर : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले असुन या वक्तव्याचा निषेध म्हणुन भारतीय जनता पार्टी पातूर तालुक्याचा वतीने पातूर येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकरजी का अपमान नही सहेगा हिंदुस्थान च्या घोषणा देत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलनात सहभागी होऊन बेताल वक्तव्य करणाऱ्या या काँग्रेस नेत्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, तसेच यापुढे असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रियांक खर्गे यांनी आधी इतिहास वाचावा, आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करावी, सावरकरांचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. सावरकरांचा अपमान करणे म्हणजे देशाचा आणि सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा आणि भारताच्या स्वातंत्र्यातील त्यांच्या योगदानाचा अपमान करण्यासारखे आहे. जेव्हा-जेव्हा वीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न होईल, तेव्हा तेव्हा अशीच जनता रस्त्यावर उतरेल आणि बेताल वक्तव्य करणाऱ्याना त्यांची जागा दाखवून देईल असे प्रतिपादन यावेळी केले.

या वेळी भिकाभाऊ धोत्रे, अनंताभाऊ बगाडे चंद्रकांत अंधारे,राजू उगले,सौ. वैशालीताई निकम सौ.शीलाताई आवटे, गजानन शेंडे, विणेश चव्हाण, संदीप तायडे,सचिन बायस,सचिन बारोकर,सचिन ढोणे, राजेश आवटे विठ्ठल लोथे,गणेश गिरी गुरुजी, अंकुश राठोड, पवन देवकते, माणिक काळे, विठ्ठल काळे,हिराभाऊ चौरे, गणेश गाडगे, डींगाबर गोतरकार,नवीन करंगाळे, दिलीप डोंगे, अंकित बायस, नीरज कुटे,विशाल कुटे,राहुल बोचरे तसेच आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.