ताज्या बातम्या

प्रणिती शिंदे लवकरच केंद्रात कॅबिनेट मंत्री

सोलापूर – सोलापूर लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय नेते विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघात नाना पटोले यांचे कट्टर समर्थक व माजी आमदार दिलीप माने यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार महाविकास आघाडीचा आमदार असेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला लीड मिळाले आहे. जनता ही भाजपच्या आमदारांना आणि भाजपच्या सरकारला वैतागली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ होईल आणि राज्यात देखील सत्ता परिवर्तन होईल, असा आत्मविश्वास दिलीप मानें यांनी व्यक्त केला आहे.

खासदार प्रणिती शिंदे लवकरच केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदावर विराजमान होतील, असा आत्मविश्वास दिलीप मानेंनी व्यक्त केला आहे. माजी आमदार दिलीप माने यांनी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातील एनडीए सरकारबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. एनडीए सरकार कोसळणार आणि इंडिया आघाडीची सरकार केंद्रात स्थापन होईल.