ताज्या बातम्या

अतुल काळसेकर यांची ‘त्या’ विधानाप्रकरणी चौकशी करा

सिंधुदुर्ग – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दि. २६ ऑगस्ट रोजी कोसळला. त्यांनतर भाजपचे महारष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांनी पुतळा कोसळल्यामागे विरोधकांचा हात आहे, असे विधान केले होते. त्या संदर्भात अतुल काळसेकर यांची चौकशी करावी. जर त्यांच्याकडे याबाबत काही माहिती असेल तर ती पोलिसांना द्यावी. नाहीतर अतुल काळसेकर यांनी खोडसाळ विधान केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. त्या मागणीचे निवेदन महाविकास आघाडी तर्फे आज कुडाळ पोलिसांना देण्यात आले. कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, मालवण राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागे विरोधकांचा हात आहे असे विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र व देशाची अस्मिता आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे देशातील कोणत्याही व्यक्तीसाठी क्लेशदायक, संतापजनक, मनात चीड आणणारे कृत्य आहे. असा विचार करणारी व्यक्ती हा देशद्रोही असेल असे आम्हाला वाटते. त्यामुळे असे कृत्य विरोधी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीकडून झाले असेल आणि याची माहिती अतुल काळसेकर यांना असेल तर अतुल काळसेकर यांची योग्य ती चौकशी व्हावी.ब ज्या व्यक्तीकडून असे कृत्य झाले असेल त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. व सत्य उजेडात यावे. या प्रकरणाचा योग्य तपस व्हावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्याच बरोबर श्री काळसेकर माहिती देऊन शकले नाहीत तर मात्र त्यांच्यावर खोडसाळ विधान केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, शिवाजी घोगळे, प्रसाद रेगे, प्रकाश जैतापकर, अभय शिरसाट, संतोष शिरसाट, तरबेज शेख, अय्यास खुल्ली, अजीम खान, नझिर शेख, आत्माराम ओटवणेकर, लालू पटेल, प्रसाद सावंत-भोसले आदी उपस्थित होते.