ताज्या बातम्या

शरद पवार गटाची सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी सात उमेदवारांची चौथी जाहीर केली. यामध्ये माण – प्रभाकर घार्गे, काटोल – सलील अनिल देशमुख, खानापूर – वैभव सदाशिव पाटील, वाई – अरूणादेवी पिसाळ, दौंड – रमेश थोरात, पुसद – शरद मैंद, सिंदखेडा – संदीप बेडसे यांची उमेदवारी पक्षाने घोषित केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जाहीर केलेल्यांपैकी पहिल्या यादीत ५४, दुसऱ्या यादीत २२ उमेदवार, तिसऱ्या यादीत ९, तर चौथ्या यादीत ७ नावांची घोषणा करण्यात आल्याने आतापर्यंत एकूण ९२ जणांची नावे जाहीर झाली आहेत.