देश

मोदी सरकार पूर्ण ५ वर्षे टिकेल – अमित शाह

 

चंदीगड – दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे कामही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. तसेच देशातील जनतेने मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवला आहे. भविष्यातही लोक त्यांच्या कामावर विश्वास ठेवतील. विरोधकांना हवं ते म्हणू द्या, तुम्ही चिंता करू नका. २०२९ मध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येईल. मोदी सरकार ५ वर्षे टिकणार नाही असं म्हणणाऱ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की, मोदी सरकार पूर्ण ५ वर्षे टिकेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.

चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, २०२९ मध्येही नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. काँग्रेसला विरोधी पक्षात राहण्याची सवय लागली पाहिजे. इंडी आघाडीला अस्थिरता निर्माण करायची आहे, त्यांना विरोधात कसे काम करायचे ते शिकावे लागेल. हे लोक पुन्हा पुन्हा सांगतात की हे सरकार चालणार नाही. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणुकीत पुन्हा सरकार स्थापन करेल.