मुंबई

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज, मंगळवारी होणार होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होऊ शकली नाही. आता याप्रकरणी 18 सप्टेंबर रोजी सुनावणीची शक्यता आहे. राष्ट्रवादीसह शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात या दोन्ही आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी एकाच वेळी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले होते. त्यानुसार दोन्ही प्रकरणांच्या सुनावणीसाठी 10 सप्टेंबर ही तारीखही देण्यात आली होती. मात्र यावेळीही सुनावणी होऊ शकली नाही. यापूर्वीही या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.