ताज्या बातम्या

मी कर्माने आदिवासी आणि मेळघाटची बेटी

अमरावती – महायुतीच्या भाजप उमेदवार नवनित रवी राणा यांनी सांगितले की गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेनुसार मेळघाटात देशातील सर्वात मोठा अमूल प्रकल्प मेळघाटात आणणार. या प्रकल्पामुळे हजारो आदिवासींना रोजगार मिळणार आहे. ऐवढेच नाही तर धारणी ते अचलपूर व बडनेरा मार्ग आता राष्ट्रीय राजमार्ग होणार आहे.

धारणी येथे हजारो आदिवासी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मंडळींच्या उपस्थितीत जाहीर सभेत खासदार नवनित रवी राणा यांनी सांगितले की, मागील बारा वर्षापासून मी मेळघाट मध्ये आदिवासी यांच्यासाठी रक्ताचे पाणी करत आहे.आधी हे सांगा की, मी मेळघाटची कन्या आहे की नाही? यावेळी सभेत उपस्थित हजारो आदिवासी ज्येष्ठ नागरिक, महिला व युवा वर्ग यांनी हात वर करून खासदार नवनित राणा यांना समर्थन दिले. आता या निवडणुकीत काही बेडूक टर टर करत सांगत आहेत की नवनित या मेलघाट ची बेटी नाही आहे. मागच्या पाच वर्षांत मेळघाटचे प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडले. मी जन्माने नाही तर कर्माने मेळघाटची बेटी म्हणून आपलं कर्तव्य निभावत आहे.

मेळघाटच्या ज्या गावात 75 वर्षांपासून विज नव्हती, तेथे सुध्दा विज पहुचविण्याचे काम केले आहे. 24 मधून बहुतांश गावात विज आली आहे. काही गावात काम सुरू आहे. काटकुंभचा जो प्रश्न आहे, तसेच जेथे लोडशेडींग सुरू आहे, ती समस्या देखील निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. देशातील कोणत्याही राज्यात मेळघाटातील मजूर अडकले तर ते सर्वप्रथम मला फोन करुन मदत मागतात. मेळघाटात शिक्षणासाठी एकलव्य सारखी मोठी शाळा आणली. मेळघाटच्या चिखलदरा येथे आशिया खंडातील सर्वात मोठे स्कायवॉक तयार होत आहे. मी प्रामाणिकपणे काम करत आहे. उपाशी लोकांच्या पोटासाठी कशी व्यवस्था करावी, या हेतूने सतत काम करत आहे. आपल्या बेटीला मेळघाटच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी धडपड करताना आपण देखील पाहत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मी काम करत आहे. आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. बारा वर्षापासून मेळघाटात जनसंपर्क ठेवला आहे. आज पर्यंत कोणत्याही खासदाराने मेळघाटात ऐवढा जनसंपर्क कधीच ठेवला नाही. आता आपल्या सर्वांचे आशीर्वादाची गरज आहे. कारण काही लोक मेळघाटाच्या विकासात अडथळा निर्माण झाला पाहिजे, या करिता नवनित राणा यांना पाडण्याचे आव्हान करत आहे. परंतु मी आपल्या आशीर्वादानेच सांगू इच्छिते की मेळघाटाचे माझे माहेरचे सर्व लोक मला भरभरुन आशीर्वाद देऊन निवडून आणेल. कारण सर्व आदिवासी बंधू भगिनींना माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवनित रवी राणाच मेळघाटाचा सर्वांगीण विकास करु शकते. असे ही नवनीत राणा म्हणल्यात.