नाशिक – महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी येत्या काळात पक्ष देईल तो उमेदवार निवडून देण्यासाठी विधानसभेत महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणावर निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले. ते भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर व नाशिक जिल्हा ग्रामीण दक्षिणच्या विस्तारित कार्यकारणी सभेत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, भाजप प्रदेश कार्यालय प्रभारी व उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, माजी आमदार बाळासाहेब सानप , नाशिक जिल्हा दक्षिण ग्रामीण अध्यक्ष सुनील बच्छाव यांसह पदाधिकारी, नेते उपस्थित होते.
यावेळी महाजन पुढे म्हणाले, शिंदे, फडणवीस व पवार या महायुतीच्या सरकारने अनेक जनहिताच्या योजना अमलात आणलेल्या शेतकऱ्यांना मागील विज बिल माफ करण्यात आले असून पुढे शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, लाडकी बहीण योजना, मुलींसाठी मोफत शिक्षण या योजना तर अमलात आणल्यास आहेत परंतु महाराष्ट्राला नंबर एकची अर्थव्यवस्था म्हणून औद्योगिक क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्रात जगभरातून गुंतवणूक वाढीस लागलेली आहे. महाराष्ट्रात जगभरातून गुंतवणुकीचा व वाढत असून अनेक नामवंत उद्योग महाराष्ट्रात येत आहेत व त्यायोगे असंख्य तरुणांना रोजगारच्या संधी तर मिळणारच आहेत आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. यावेळी त्यांनी भाजपचे लाडके नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर कट कारस्थाने रचून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न तत्कालीन महाविकास आघाडी तर्फे करण्यात आला परंतु महाविकास आघाडीचे हे षडयंत्र यशस्वी झाले नाही. आता ही विरोधक लाडकी बहीण सारख्या माता भगिनींच्या अर्थसाह्य योजनांना विरोध करत आहेत ही खेदाची बाब आहे परंतु यावेळी त्यांनी घराघरात जाऊन लाडक्या बहिणी योजनेची माहिती देऊन आपापल्या भागातील माता-भगिनींना देऊन या योजनेचा लाभ मिळवून द्यावा तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवाव्यात असे ते म्हणाले.