कृषी

महाराष्ट्र, गोव्यासाठी 20,000 मेट्रिक टन तांदूळ साठा उपलब्ध

भारतीय अन्न महामंडळाच्या खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध

नवी दिल्ली – 07 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात एकूण 20,000 मेट्रिक टन तांदळाचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे. या लिलावात व्यापारी/ घाऊक खरेदीदार/ तांदूळ उत्पादक सहभागी होऊ शकतात.

तांदूळासाठी प्रत्येक बोलीदाराची किमान बोली 10 मेट्रिक टन असेल आणि त्याला कमाल बोली 1000 मेट्रिक टन पेक्षा जास्त लावता येणार नाही. ओएमएसएस (डी ) योजना चढ्या किंमती आटोक्यात ठेवण्यास मदत करेल आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा देईल.

भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून खुल्या बाजार विक्री योजना- देशांतर्गत (ओएमएसएस-डी) द्वारे तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे.

तांदूळ साठा खरेदी करण्यास इच्छुक असलेले खरेदीदार एफसीआय च्या ई-लिलाव सेवा प्रदात्याच्या “m-Junction Services Limited” https://www.valuejunction.in/fci/ वर नोंदणी करून साठ्यासाठी बोली लावू शकतात. नोंदणी इच्छुक खरेदीदारांची नोंदणी प्रक्रिया 72 तासांच्या आत पूर्ण केली जाईल.