महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर हॅकरचा डोळा

नाशिक – महायुती सरकारची अतिशय महत्त्वपूर्ण असलेली लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यावरती जमा होणाऱ्या पैशावरती आता हॅकर चा डोळा असून काही महिलांच्या खात्यावरून हॅकरने पैसे काढून घेतल्याची घटना घडली आहे. सरकारने विविध योजना सुरू केले आहे त्याच्यात एक भाग म्हणून लाडकी बहीण योजना ही सुरू करून महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत आणि ते काम सध्या सुरू आहे. पण मात्र या ठिकाणी पुन्हा गुन्हेगारी वृत्तीने आपला शिरकाव केला असून या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती जमा होणाऱ्या पैशावरती हॅकर चा डोळा असून लाडकी बहीण योजनेच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून पैसे काढून घेणारा हॅकर पाठवलेल्या ओटीपी मागून घेतो आणि त्यानंतर या महिलांच्या खात्यावरील जमा झालेले पैसे काढून घेण्याच्या घटना घडत आहे.

आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणतः पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे सरकारने दिलेले पैसे हे चोराचे धन होत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांचे पैसे जमा झाले पण हे पैसे जमा झाल्यानंतर काही वेळातच बँकेमधून पैसे गायब झाल्याच्या तक्रारी समोर आले आहे काहींनी हे पैसे बँकेने बॅलन्स नाही म्हणून काढले असे सांगितले गेले तर काहींनी ओटीपी आला आणि पैसे गेले असे सांगितले प्रत्यक्षात महिलांना हे पैसे हॅकरणे काढले हे लक्षातच आले नाही त्यामुळे याबाबत दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या ही आज तरी कमी आहे पण भविष्यात नक्कीच वाढू शकते चौकट -2 याबाबत नाशिकचा सायबर सेल विभागाशी संपर्क साधला असता सायबर सेल कडे तक्रारी दाखल झालेल्या नसल्या तरी स्थानिक पोलीस स्टेशनला अशा तक्रारी दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे कारण सायबर सेल ला पाच लाखाच्या पुढे होणाऱ्या फसवणुकी संदर्भातील तक्रारी या दाखल होत असतात