महाराष्ट्र

कोळी सवांद यात्रेला नवी मुंबईतून सुरूवात

मुंबई : अखिल भारतीय कोळी समाज संघटनची कोळी संवाद यात्रा रविवार दिनांक २५ फेब्रुवारी पासून अखिल भारतीय कोळी समाज प्रदेश अध्यक्ष केदारजी लखेपुरीया, सरचिटणीस सचिनजी ठाणेकर यांच्या नेतृत्वात नवी मुंबई येथून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय कोळी समाजाचे युवा सरचिटणीस अजिंक्य दिपक पाटील यांनी दैनिक राज्योन्नती प्रतिनिधी सोबत बोलतांना दिली.
कोळी समाज महाराष्ट्राच्या विविध भागात वसलेला आहे, मात्र, मुंबईच्या समुद्रकिनारी राहणारा कोळी बांधव विविध समस्यांग्रस्त आहेत, अशा बांधवाच्या समस्या समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या वतीने कोळी जनसंवाद यात्रेची सुरूवात नवी मुंबई येथून करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय कोळी समाजाचे युवा सरचिटणीस अजिंक्य दिपक पाटील यांनी सांगितले.