अमरावती– अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात येत असलेल्या थुगाव पिंपरी येथे पूर्णा नदी पात्रात थुगाव येथील रहिवासी शिवराम सावलकर (५५) हे दुपारी एक वाजता बुडल्याची प्राथमिक माहिती तहसील प्रशासनाला मिळाली त्याआधारे तहसील प्रशासनाकडून जिल्हा बचाव पथक यांना बोलावण्यात आले. जिल्हा बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी अवघ्या दहा मिनिटात बुडालेल्या इसमाचा मृतदेह शोधून काढला.नदी ही दोन नद्यांचा संगम बनून वाहत असते. तालुक्यातील काजळी देऊरवाडा येथे पूर्णा नदी आणि मेघा नदीचा संगम होऊन ते सोमर थुगाव पिंपरी गावाकडून तिकडे वाहत असते. सध्या दोन्ही नद्या वाहत असून मेघा नदीला मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. तर नद्याचे झालेल्या खोलीकरणामुळे पाण्याचा अंदाज अचूक येत नसल्याने कोणीही नदीपात्रात जाऊ नये असे सूचना तहसील प्रशासनाकडून देण्यात आले. घटनास्थळी, चांदूरबाजार तहसील ते तहसीलदार ऋणय चकुलवार तसेच मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल उपस्थित होते.