अकोला महाराष्ट्र

अकोला भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, सावरकरांभोवती पराभवाचा केंद्रबिंदू

अकोला – ऐन निवडणुकीच्या काळातच भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या माजी महापौर अश्विनी हातवळणे यांनी भाजप आमदार तथा उमेदवार रणधीर सावरकर यांच्यावर आरोप केले आहेत. आपल्याला पक्षात त्यांच्याकडून अपमानाची वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र आपण पक्षात राहून काम करीत राहू असेही त्यांनी म्हटलं आहे. माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांचे निवडणुकीत काम केल्याने आपल्याला अशी वागणूक सावरकर यांच्याकडून मिळत असल्याचं हातवळणे यांचं म्हणणे आहे. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक गिरीश गोखले, प्रतुल हातवळणे यांनी देखील सावरकर यांच्यावर आरोप केले आहेत.

आपला राग भारतीय जनता पक्षावर नसून अकोल्यातील नव्या नेतृत्वाला असल्याचं म्हणत भाजपच्या माजी महिला महापौर अश्विनी हातवळणे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत तठस्थ भूमिका घेतली. अकोला पश्चिम मतदार संघात भाजपची आधीच बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली असताना आता भाजप सोबत गेल्या 34 वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी भाजपचे आमदार रणधीर सावरकर सातत्याने भाजपच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अपमान करत असल्याचा आरोपही हातवळणे यांनी केला. तर आपण फक्त निवडणुकीच्या प्रचारातून बाहेर पडत असून विधानसभा निवडणूक असल्याने आपण भाजपच्या विरोधात काम करणार नाही, असं वक्तव्य असल्याचंही ते म्हणाले. तर हातवळणे दांपत्याने निवडणूक प्रचाराच्या संचालन समितीचा राजीनामा दिला आहेय.. उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा अकोल्यात होणार आहे. त्यापूर्वीच अकोल्यात पक्षांतर्गत वाढत असेलल्या नाराजीने भाजपला मोठा फटका बसणार असल्याचे चिन्ह आहे.