मुंबई – चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. बीसीसीआयने आयसीसीकडे भारताचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची विनंती केली आहे.
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसू शकतो, कारण त्यांनी या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली होती. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळवल्यानंतर लाहोर, रावळपिंडी, आणि कराची ही तीन ठिकाणे निवडली होती. आयसीसीला पाठवलेल्या प्रस्तावित वेळापत्रकात भारताचे सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित होते.आता बीसीसीआयच्या प्रस्तावानुसार, आयसीसीला या निर्णयावर विचार करून अंतिम निर्णय घ्यावा लागेल.