आंतरराष्ट्रीय

दुबईत भारतीय मुलाची पाकिस्तानींकडून हत्या

दुबई – दुबईत २१ वर्षीय मनजोत सिंग या भारतीय मजूराची पाकिस्तानी लोकांच्या एका गटाने चाकूने भोसकून हत्या केली आहे. लुधियाना जिल्ह्यातील त्याच्या वडिलांनी ही माहिती दिली. त्याचा मृतदेह उद्या भारतात येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

मनजोत सिंग दुबईतील एका औषधांच्या कंपनीत मजुरी करत होता. लुधियाना जिल्ह्यातील रायकोट उपविभागातील लहाटबट्टी या गावातील हा मुलगा आईवडीलांचा एकुलता एक होता. पंजाबमध्ये मजुरी करणाऱ्या त्याच्या वडिलांनी त्याला कर्ज काढून दुबईत कामासाठी पाठवले होते. त्याचे एका पाकिस्तानी मित्राबरोबर भांडण झाले. त्याने त्याच्या मित्रांना बोलावले. त्यानंतर दोन गटात हाणामारी झाली. यावेळी पाकिस्तानी लोकांच्या गटाने त्याची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी दुबई पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.