अकोला

अकोल्यात चिमकल्यांवरील अत्याचार थांबता थांबेनात

अकोला – कोलकाता येथे एका डॉक्टरवर अत्याचार करण्यात आल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. 13 ऑगस्टला घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी बदलापूरमध्ये 20 ऑगस्टला प्रचंड जनक्षोभ उसळला होता. बदलापूरमध्ये रेल रोकोही करण्यात आला. या प्रकरणी आता पीडितेच्या पालकांनी शाळा आणि पोलिसांवर आरोप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे ही घटना ताजी असतानाच अकोल्यातील काजीखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत एका नराधम शिक्षकाने विकृतीचा कळस गाठत सहा शाळकरी विद्यार्थिनींचा अश्लील व्हिडिओ दाखवत विनयभंग केला. दरम्यान या घटनेनंतर राज्यासह अकोला जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आरोपीला शिक्षकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आता पुन्हा एका संतापजनक घटनेने अकोला हादरले आहे. त्यामुळे आता अकोला शहरात चिमकल्यांवरील अत्याचार थांबता थांबेना अशी परिस्थिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोलकाता, बदलापूर, अकोला या घटनांवर संताप व्यक्त केला जात असतानाच आता पुन्हा अकोल्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. अकोट अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका मामाने आपल्या 10 वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी मामा विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मात्र राज्यात आणि देशात अल्पवयीन मुलींवर आणि महिलांवर होणारे अत्याचार थांबता थांबत नाहीयेत.

तेल्हारा तालुक्यातील 10 वर्षीय मुलगी शिक्षणासाठी अकोल्यातील आपल्या मामा कडे राहायला होती. एक महिन्या आधी घरी आई – वडील नसतांना आरोपी युवराज गवळी ( रा. हिंगणा तामसवाडी ) ने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तर या बाबत कोणालाही सांगितल्यास तू माझ्या सोबत स्वतच्या मर्जी ने करत असल्याच आपण तुझ्या वडिलांना सांगणार अशी धमकी पिढीत मुलीला आरोपीने दिली. मात्र रोज होणाऱ्या अत्याचारा पासून कंटाळून काल मुलीच्या भेटीला आलेल्या वडिलांना मुलीने सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर आरोपीचे कृत्य उघडकीस आले. पीडित मुलीच्या वडिलांनी अकोट फाईल पोलिसात आरोपी विरुद्ध तक्रार दिली यानंतर पोलिसांनी तत्परतेने 20 वर्षीय आरोपी मामाला अटक करून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.