road-accident
क्राईम

गोंदिया : अपघातात चालकाचे धडापासून मुंडके झाले वेगळे; अपघात की घातपात ?

गोंदिय : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी-चिचगड मार्गावर दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचे धडापासून मुंडके वेगळे झाल्याची घटना सालईजवळ घडली. मात्र, या विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचे धडापासून मुंडके वेगळे झाल्याने हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे. निकेश कराडे (32) रा. मोहगाव,ता. देवरी असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, निकेश हा त्याच्या दुचाकी क्रमांक एमएच 35 एव्ही 2968 ने देवरीवरून आपल्या गावाकडे जात होता. दरम्यान, सालईजवळ त्याच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात निकेशचे धडापासून मुंडके वेगळे झाले होते. त्यामुळे हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे.