गुरुग्राम : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका तरुणाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या प्रेयसी स्क्रू डायव्हरने जीवघेणा हल्ला केला. सेक्ससाठी नकार दिल्याने नराधमाने तरुणीचा खून करण्याचा प्रयत्न केला.
उत्तर प्रदेशमध्ये राहणार्या आरोपीला गुरुग्रामच्या राजीव चौकातून पोलिसांनी अटक केलीय. शिवम कुमार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी शिवम विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर अटकेची कारवाई केलीय.पीडित तरुणीने आरोप करत म्हटलंय की, शिवमने शारीरिक संबंध करण्यासाठी मला मजबूर केलं.
जेव्हा मी शिवमला शारीरिक संबंध करण्यासाठी नकार दिला, त्यावेळी त्याने माझ्या मानेवर स्क्रू डायव्हरने हल्ला केला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला तिच्या नवर्यापासून वेगळं होऊन भाड्याच्या घरात राहत होती. त्यावेळी तिची ओळख उत्तर प्रदेशच्या कनौजमध्ये राहणार्या शिवम कुमारशी झाली होती.
दोघांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप सुरु झाल्यावर शिवमने लग्नाचा बहाना देऊन शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचं याआधीही लग्न झालं असल्याचं पीडित महिलेला समजलं होतं.आरोपी शिवमने पीडित महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केल्यानंतर तिला शेजारी राहणार्या लोकांनी रुग्णालयात दाखल केलं.
पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवमविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. एसीपी वरुण दहियाने म्हटलं की, आरोपीला शुक्रवारी राजीव चौकातून अटक करण्यात आलं. या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरु आह