अकोला – रिपाइं (आठवले) अकोला जिल्ह्याच्या वतीने अतिक्रमण धारकांच्या न्याय हक्कासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यलयावयावर 5 ऑगस्ट 2024 रोजी ठीक वाजता भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुनील अवचार करणार असून प्रमुख मारदर्शक म्हणून रिपाइं (आठवले)चे प्रदेश सेक्रेटरी सुमित वजाळे हे उपस्थिती लावणार आहेत. हा आक्रोश मोर्चा अशोक वाटिका येथून निघणार असून, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्गे अकोला जिल्हाधिकारी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून ई-क्लास् जमिनीवर ,वन जमिनीवर शेतीसाठी केलेल्या अतिक्रमण धारकांना कायम पट्टे देण्यात यावेत त्याचं प्रमाणे गावठाण जमिनीवर ज्या लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत अशा अतिक्रमण धारकांना नमुना 8-अ देण्यात यावा, तसेच त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा,त्याचं प्रमाणे सन 2011पर्यन्त् केलेली सर्व अतिक्रमणे नियमित करावी, सरकारी इ-क्लास् जमिनीवर होणारे सौर ऊर्जा प्रकल्प इतरत्र उभारावे, त्याच प्रमाणे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना प्रभावी पणे राबवून,नमूद योजने अंतर्गत शासकीय भावात शेतकऱ्यांना जमिनी उपलब्ध् करून देण्यात याव्या, अशाप्रकारे प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
या मोर्चांमध्ये जिल्हाभरातून शेकडो अतिक्रमण धारक सामील होणार असून,या मोर्चा मध्ये, जिल्हा महासचिव जे.पी.सावंग,युवक आघाडी जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण, अकोला तालुका अध्यक्ष बाळासाहेब दामोदर, अकोट तालुका अध्यक्ष दयानंद तेलगोटे, दिनेश पेटकर,तेल्हारा तालुका अध्यक्ष गणेश थोरात,भोमराव तायडे,भारत पोहरकर,सुरज तायडे,दिलीप थोरात, दिनेश गवई,बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष जुगलकिशोर जामनिक,जनार्धन खिल्लारे,सागर जामणिक, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष अजय प्रभे,समाधान वानखडे, पातूर तालुका अध्यक्ष पंडित सदार, सिद्धार्थ धाडसे, दादारावं गवई, देविदास वानखडे,जगदेव हिवराळे,प्रकाश तायडे,हिम्मतराव तायडे, किशोर निलकंठ,अब्दुल साबीर अब्दुल गणी, इत्यादी पदाधिकारी या मोर्चा मध्ये सहभागी होणार असून,या मोर्चाला जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण धारकांनी हजर राहावे ,असे जिल्हा जिल्हा महासचिव जे.पी.सावंग यांनी केले आहे.