अकोला

अतिक्रमण धारकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला!

अकोला –  जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांच्या विविध समस्यांसाठी 5 ऑगस्ट रोजी,दुपारी 1 वाजता , रिपाइं (आठवले) च्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा अशोक वाटिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांनी केले,तर या मोर्चाला मार्गदर्शक म्हणून रिपाइं चे प्रदेश सचिव सुमित वजाळे यांची उपस्थिती होती. मोर्चाची सुरुवात अशोक वाटिका येथून करण्यात आली.

या मोर्चा माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले,या निवेदनात अकोला जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण,केलेल्या अतिक्रमण धारकांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे, शेती व घरासाठी केलेले अतिक्रमण निष्काशीत करण्यात यावे, आता पर्यंत 14 एप्रिल 1990 च्या अतिक्रमण संदर्भातील आदेशानुसार सरकारी गायरान,ई-क्लास्,वन जमिनीच्या मालकी हक्का बाबत जो शासनाचा निर्णय आहे.

त्या शासनानिर्णयाची मुदत 2011 पर्यंत मुदत वाढवावी, महाराष्ट्रात स्मार्ट शेती मध्ये होणारे अतिक्रमण आहे.जसे की,1985,1996,2000 दि 23/01/2011 च्या धर्तीवर ग्रामीण भागातील अतिक्रमणच्या मुदत वाढवून 2019 पर्यंतचें अतिक्रमण नियमित करण्यात यावे,दादासाहेब सबलीकरण सबळीकरन योजनेची योग्य अंमलबजावणी शासनाच्या सभागासह समान विभागणी करावी, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी जमिनी दिल्या जात आहे,हे प्रकार थांबवावेत इत्यादी करण्यात चे निवेदन देण्यात आले, या मोर्चात जिल्ह्यातून शेकडो अतिक्रमण धारक सहभागी झाले होते, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर प्रदेश सेक्रेटरी सुमित वजाळे, रिपाई (आठवले) गटाचे जिल्हा अध्यक्ष सुनील अवचार, जे.पी.सावंग,बुद्धभषण गोपनारायण,गणेश थोरात,भीमराव तायडे,बाळासाहेब दामोदर,राजू निशानराव,पंडित सदार, गजानन धाडसे, दयानंद तेलगोटे, दिनेश पेटकर,किशोर नीलकंठ,जुगलकिशोर जामनिक,सतीश वाकोडे, यांच्या स्वाक्षरी आहेत.