ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ‘ब्रिक्स’ समूहाची परिषद जोहान्सबग& येथे पार पडली. तेथे या समूहाचा विस्तार करण्याचा निर्णय झाला असून अजें&टिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया असे सहा देश नव्याने या गटात आले आहेत.
या गटात येण्याची जगातील आणखी पन्नासेक देशांची इच्छा आहे. त्यामुळे, जोहान्सबग&मध्ये झालेला विस्तार हा पहिला टप्पा असू शकतो. ही संघटना एक आथि&क फळी म्हणून मजबूत करण्याचा चीन आणि रशिया या मित्रांचा निधा&रच आहे.जगातील विकसित आणि श्रीमंत देशांना ‘नॉथ&’ असे म्हटले जाते. त्यात येणारे युरोपातील देश किंवा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या गटात नाहीत, हे लक्षात ठेवावे लागेल.
नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत रशियाचे हुकूमशहा व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेन युद्धामागची आपली भूमिका समजावून दिली आणि काहीसा औचित्यभंग करून या परिषदेचे व्यासपीठ द्विपक्षीय संघषा&चे समथ&न करण्यासाठी वापरले. पुतिन स्वत: परिषदेला आले नाहीत.
मात्र, त्यांचे व्हिडिओ भाषण इतरांनी ऐकले. त्यात त्यांनी युक्रेन युद्धाचा ठपका सरळच युरोपीय देश आणि अमेरिकेवर ठेवला.‘ब्रिक्स’च्या खलबतखान्याला नव्या विटा लावण्यामागे केवळ राजकीय विचार नाही. युरोपीय देशांनी जसे ‘युरो’ हे चलन स्वीकारले; तसे ‘ब्रिक्स’ने संयुक्त चलन स्वीकारावे असा आग्रह पुतिन यांनी बराच काळ धरला आहे. तो यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण युरोप हा अनेक अथां&नी एकसंध होता व आहे. ‘ब्रिक्स’मध्ये अनेक देश एकत्र असले तरी त्यांचे द्विपक्षीय संबंध फारसे प्रेमाचे नाहीत. यातले भारत आणि चीन या जुन्या सदस्यांचे जसे उदाहरण आहे; तसाच दाखला इराण आणि सौदी अरेबिया या नव्या सदस्यांचाही देता येईल. मात्र, ते होईपयं&त ब्रिक्सच्या सदस्यांनी निदान परस्पर व्यापार तरी डॉलरमुक्त करावा, असा आग्रह धरला जातो आहे.
चीन आणि रशिया यांचा द्विपक्षीय व्यापार मोठ्या प्रमाणात परस्पर चलनांमध्ये चालतो. या आघाडीवर भारतानेही अनेक पावले टाकली आहेत. मात्र, जगाच्या अथ&कारणावर असणारा डॉलरचा दबदबा कमी करणे, अनेक कारणांमुळे सोपे नाही. डॉलर अनेक रूपांनी जगाच्या हाडीमांसी जाऊन खिळला आहे. तेथून त्याला हुसकावणे, सोपे नाही. त्यातच, ब्रिक्स किंवा इतर कोणत्याही गटांतील अनेक देश एकाचवेळी इतरही विविध गटांमध्ये आहेत. भारताचेच उदाहरण घेतले तर सध्या भारताकडे जी-२० समूहाचे अध्यक्षपद आहे.
या गटात तर अमेरिकेसहित अनेक विकसित देश आहेत. तेव्हा उद्या भारताचीही बांधिलकी ‘ब्रिक्स’मध्ये किती प्रमाणात राहील, याची काही शाश्वती नाही. ‘क्वाड’ हे राष्ट्रचतुष्टय आथि&क अजेंडा असणारे नसले तरी ते उघडपणे चीनच्या विरोधात आहे.
आथि&क आणि भू-राजकीय हितसंबंध यांची परस्पर गुंतागुंत संबंधांना नवनवीन वळणे लावत असतात. युक्रेन आणि त्या आधी आखाती युद्धाने हे दाखवून दिले आहे. तेव्हा ‘ब्रिक्स’चा विस्तार करून पाश्चात्य देश व अमेरिकेला अथ&शह देता येईल, हे चीन व रशियाचे मनसुबे लगेच यशस्वी होतील, असे नाही.आज जगात निदान दहा-पंधरा राष्ट्रगट आपापली उद्दिष्टे गाठण्यासाठी एकत्र येत असतात. यातले अनेक गट हे आथि&क सहकाया&साठी बनले आहेत.
भारतही अशा अनेक गटांचा सदस्य आहे. मात्र, गेल्या दोन दशकात युरोपीय युनियन हा विकसित देशांचा समूहदेखील अमेरिकेचे अथ&वच&स्व म्हणावे तसे कमी करू शकलेला नाही. अशावेळी, विकसित, अविकसित, अध&विकसित अशा सगळ्या देशांची मोळी ब्रिक्समध्ये बांधली तरी ती अमेरिकेला आणि डॉलरचे वच&स्व मोडून काढू शकणार नाही. भारताच्या दृष्टीने ब्रिक्सचा विस्तार हा विषय निव्वळ आथि&क नाही.
भारत गेल्या काही वषां&त क्रमाक्रमाने पश्चिमेकडे झुकतो आहे. युक्रेन संघष& चालू असतानाही रशियाकडून तेल घेण्यातून भारताची जुनी अलिप्तता अधोरेखित झाल्यासारखी वाटली तरी भारताने आपला चेहरा आणि मोहरा पुरता पाश्चात्य आणि अमेरिकेच्या दिशेने वळविला आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, पश्चिम युरोप.. हे भारताचे सगळे मित्र चीन आणि रशिया यांना मित्र मानत नाहीत. किंबहुना, धोकाच मानतात. अशावेळी, ‘ब्रिक्स’चा होणारा विस्तार म्हणजे जुन्या सोविएत ब्लॉकचे चीनसहित पुनरुज्जीवन असेल तर तेथे भारताचा प्रभाव टिकणे किंवा अगदी सदस्यत्वही अथ&पूण& होणे, अवघड आहे.
चीन आणि रशिया यांची वाढती मैत्री, सहकाय& आणि त्यांची कथित कम्युनिझमची समान पाश्व&भूमी हे सारे भारताच्या अडचणी वाढविणारे आहे.‘ब्रिक्स’चा विस्तार हा त्यामुळेच शीतयुद्धाच्या नाना अथ&च्छटा भविष्यात दृग्गोचर करीत जाणार आहे.
त्यामुळे, ‘ब्रिक्स’ न सोडता त्याचा चीन-रशिया मैत्री महास्ांघ होणार नाही, याची काळजी भारताला घेत राहावी लागेल. अर्थात, भारताच्या आर्थिक ताकदीचा पंतप्रधानांनी जोहान्सबर्गमध्ये जो ठाम उच्चार केला; त्याची नवे व भावी सदस्यही योग्य ती दखल घेतीलच. सोविएत युनियनचा पाडाव झाल्यानंतर आणि दोन्ही जर्मनींचे एकीकरण झाल्यानंतर शीतयुद्धाच्या ज्वाळांपासून जगाची आता कायमची सुटका झाली, असा भाबडा आशावाद काही काळ निर्माण झाला होता.
मात्र, रशियात पुतिन आणि चीनमध्ये शी जिनपिंग यांनी जम बसविल्यापासून शीतयुद्धाने नव्याने पेट घेतला. ‘ब्रिक्स’चा विस्तार ही शीतयुद्धाच्या पटावरची छोटीशी खेळी आहे. तिचेही प्रतिपडसाद लवकरच उमटतील.