earthquake-of-7-1-magnitude-hits-nepal-tremors-felt-in-india-too
आंतरराष्ट्रीय

नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप, भारतातही जाणवले भूकंप

नवी दिल्ली : शेजारील देश नेपाळमध्ये मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी 6.35 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी मोजली गेली. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या बिहार तसेच पश्चिम बंगालच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

USGS Earthquakes नुसार, नेपाळमध्ये मंगळवारी सकाळी 6:35 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या लोबुचेपासून 93 किमी उत्तर-पूर्वेला होता. त्यामुळे बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी घाबरून मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले.

नेपाळमध्ये अलिकडच्या काही वर्षांत वारंवार भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजली गेली. तर एप्रिल 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला होता. या कालावधीत, अंदाजे 9,000 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि 20,000 हून अधिक जखमी झाले. या विध्वंसात मोठ्या प्रमाणात घरे आणि शाळांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.