अकोला ताज्या बातम्या

रिपाईच्या  (आठवले) वतीने विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्याची मागणी

राज्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता सदर विद्यार्थ्यांना पुढील वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देऊन सत्र 2023 मिळालेल्या कॅरी ऑनप्रमाणे या वर्षी सुद्धा मागील राहिलेले विषय काढण्याची संधी देण्यात यावी व पुनर्मूल्यांकनामध्ये विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेता सदर विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची मागणी मंजूर करण्यात यावी अशी विनंती मा. कुलगुरू वा मा.परीक्षा नियंत्रण डॉ.नितीन कोळी यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे रिपाई (आठवले) गटाच्या वतीने मागणी करण्यात आली.

राज्यात कायद्याचा अभ्यास करणारे एलएलबीचे विद्यार्थी उन्हाळी परीक्षा सत्र २०२४ मध्ये मोठया प्रमाणात अनुउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती, हित लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे अभ्यासक्रमला कॅरी ऑन मिळने देवून त्यांना पुन्हा संधी मिळावी या दृष्टीने अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृमध्ये प्रवेश पात्रतेच्या निकष लक्षात घेता. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ.मिलिंद बारहाते साहेब यांना दिले निवेदन देण्यात आले.

सदर मागणी मान्य न झाल्यास रिपाई युवक आघाडी तर्फे कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन रिपाई युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. बुद्धभूषण डी. गोपनारायण, यांच्या नेतृत्त्वात देण्यात आले यावेळी युवक जिल्हा महासचिव अजय ह. गवई, अजय शिरसाठ, आशिष इंगळे, शंतनू उपाध्ये, सलमान खान, कौशल पटेल, अंकित मोटवानी, सलाउद्दीन खान, अभिजित वानखडे यांच्यासह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.