ताज्या बातम्या

अकोला जिल्हयात काँग्रेसचे मनोबल वाढले, सर्वच मतदारसंघावर दावा

अकोला – लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला काही प्रमाणात का होईना ‘अच्छे दिन’ आले असं म्हणता येईल. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. जिल्ह्यात 49 इच्छुकांनी अर्ज सादर केले. सर्वच मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सह प्रभारी कुणाल चौधरी यांनी 16 सप्टेंबर रोजी स्वराज भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाले. त्यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसला इतर पक्षाच्या तुलनेत चांगल्या जागा जिंकता आल्या. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराच्या मतदानात भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचे मनोबल वाढले आहे. आधीच गटा तटात विभागाल्या काँग्रेसला काही प्रमाणात का होईना अच्छे दिन आले असं म्हणता येईल.

तर दुसरीकडे अकोला पश्चिम या मतदारसंघात काँग्रेसने लोकसभेत भाजपच्या विजयी उमेदवारापेक्षाही जास्त मतदान घेतले आहे. त्यामुळे अकोला पाश्चिम मध्ये दावेदारांची संख्या ही वाढली आहे. जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसच्या इच्छुकांकडून दावा करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघातून काँग्रेसच्या 49 इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज हे अकोला पश्चिम मधून आले आहेत. तर सर्वच मतदारसंघातून काँग्रेसचे इच्छुक आघाडीवर आहेत.

काँग्रेस प्रभारी यांनी घेतला आढावा !
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा निहाय आढावा घेण्याकरिता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह-प्रभारी कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीत अकोल्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैडकीस जिल्ह्यातील 2009 व 2014 तसेच 2019 विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार तसेच आगामी विधानसभा निवडणुकीचे ईच्छूक उमेदवार, लोकसभेचे उमेदवार तसेच आदींचा आढावा घेण्यात आला. यावेळी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती ही यावेळी घेण्यात आल्या. अकोला जिल्ह्यातील माझ्याही मतदारसंघातून एकूण 49 उमेदवार इच्छुक आहेत तेही या बैठकीला उपस्थित होते. मोठी गर्दी स्वराज्य भवन परिसरात पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला राज्यात अच्छे दिन आले आहेत. इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहता. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळत असल्याचे सर्व्हे मधून समोर आलं आहे. तर, काँग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी यांनीही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असं म्हटलं आहे.