Chhattisgarh: 9 soldiers martyred in Naxal IED blast
देश

छत्तीसगड : नक्षल्यांच्या आयईडी स्फोटात 9 जवानांन हौतात्म्य

बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी आज, सोमवारी सुरक्षा दलाच्या वाहनावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात दंतेवाडा डीआरजीचे 8 जवानांनी हौतात्म्य पत्करले. मृतकांमध्ये एका वाहनचालकाचा समावेश असून सुमारे 6 जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती बस्तरच्या पोलिस अधिक्षकांनी दिली.

बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन पूर्ण करून परतत असताना विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी हा घातपात केला. नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. यामध्ये 8 दंतेवाडा डीआरजी जवान आणि एक ड्रायव्हर यांचा मृतांमध्ये समावेश आहे. हा स्‍फोट एवढा भीषण होता की, जवानांच्‍या वाहनाचे तुकडे झाले. सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे मृतांची संख्‍या वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाकडून परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. माओवाद्यांच्या या हल्ल्याबाबत प्रशासन आणि सुरक्षा दलांमध्ये तीव्र नाराजी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाचे एक वाहन कुत्रूच्या दिशेने जाणार असल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली होती. याआधीही त्यांनी घाताची तयारी केली होती. वाहन जवळ येताच नक्षलवाद्यांनी शक्तिशाली आयईडी स्फोट केला, ज्यामुळे पोलिस पिकअप वाहन 20 फूट उंच उडी मारली. या स्फोटानंतर घातपात बसलेल्या नक्षलवाद्यांनीही वेगाने गोळीबार सुरू केला. या घटनेची माहिती मिळताच बस्तरचे आयजी सुंदरराज विजापूरला रवाना झाले. त्याचवेळी रायपूरचे डीजीपी अशोक जुनेजा हेही एक महत्त्वाची बैठक सोडून हेलिकॉप्टरने बस्तरला रवाना होत आहेत.