मुंबई

मुंबईतील गणेश विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

महानगरातील धोकादायक 13 पुलांची यादी जाहीर

मुंबई – अनंतचतुर्थीनिमित्त मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत तर काही पर्यायी मार्ग दिले आहेत. त्याचबरोबर शहरातील 13 धोकादायक पुलांची यादीही महापालिकेने दिली आहे. या पुलावरून मिरवणूक जात असताना 100 पेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळी नसाव्यात, असे निर्देश दिले आहेत. गणेश विसर्जनानिमित्त मंगळवारी शहरातील वाहतूक व्यवस्था तात्पुरती डायवर्ट केली आहे. काही रस्ते बंद करण्यात आले आहेत तर काही मार्गावरील एकतर्फी वाहतूक सुरू राहणार आहे. विसर्जन सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडीपासून वाचवण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत.

उत्तर मुंबई ते दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज रोड खुला आहे. अटल सेतुवरून दक्षिण मुंबईत विलासराव देशमुख ईस्ट फ्रीवे (फ्रीवे) मार्ग पी डी’मेलो रोड-कल्पना जंक्शनवरून डावीकडे वळून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – महापालिका मार्ग – मेट्रो ते प्रिंसेस स्ट्रीट ते कोस्टल रोडकडे जाता येणार आहे. तसेच नाथलाल पारेख मार्गावरील भाई बंदरकर मार्ग ते इंदु क्लिनिकपर्यंत दोन्ही मार्ग बंद करण्यात आला असून त्याऐवजी कॉम. प्रकाश पेठे मार्ग ते पांडे लेन जंक्शनपर्यंत. संत गाडगे महाराज ते पांडे लेन चौक उत्तर वाहिनीपर्यंत पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलाय. तसेच मरीन ड्राइववर नेताजी सुभाष चंद्र मार्ग, एअर इंडिया जंक्शन ते मफतलाल जंक्शनपर्यंत दोन्ही बाजुला पार्किंग प्रतिबंधित राहणार आहे. त्याचप्रमाणे आजाद मैदान डिवीजन- सीएसएमटी जंक्शन ते डी.एन. पर्यंत. एल.टी. रूट डायवर्ट करण्यात आला आहे. तर अल्फ्रेड जंक्शन ते पुर्तगाल चर्चपर्यंत वाहतूक बंद राहील. कस्तूरबा गांधी चौक ते नित्यानंद हॉटेल जंक्शनपर्यंत मार्ग बंद राहील व वाहतूक पर्यायी मार्गाने कालबादेवी रोड आणि महर्षि कर्वे रोडने डायवर्ट केली जाईल.

घोड़ागाड़ी जंक्शन ते खट्टर गल्ली, चर्नी रोड स्टेशन ते प्रार्थना समाज जंक्शन, गुलाल वाडी स्पायरल ते सीपी टँक मार्ग बंद राहील. बँडस्टैंड ते मफतलाल दोन्ही मार्ग बंद राहतील. नवजीवन स्पायरल ते एम पॉवेल रोडवर वाहतूक बंद राहील. तीन बत्ती जंक्शन ते बँडस्टँडपर्यंत एकतर्फी वाहतूक सुरू राहील. केनेडी ब्रीज, ओपेरा हाउस जंक्शन, मराठे बंधू चौक ते नवजीवन जंक्शन, प्रार्थना समाज बाटा जंक्शन ते प्रार्थना समाज रोड वर नो-पार्किंग असेल.

नागपाड़ा भागातील गुलाबराव गणाचार्य चौक ते खटाव मिल, सतरस्ता जंक्शन ते खाडा पारशी जंक्शन, खाड़ा पारशी जंक्शन ते नागपाड़ा जंक्शन, नागपाड़ा जंक्शन ते मुंबई सेंट्रल जंक्शन, शुक्लाजी स्ट्रीट ते टू टँक जंक्शनपर्यंत वाहतूक बंद राहील. गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान अग्रीपाड़ा, नागपाड़ा, सतरस्ता जंक्शन, खड़ा पारसी, चिंचपोकळी, मुंबई सेंट्रल जंक्शन, दो टँक जंक्शन आदी ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. बावला कंपाउंड ते भारत माता जंक्शन पर्यंत नॉर्थ चॅनल वाहतूक बंद राहील. चिंचपोकळी जंक्शन ते संत जगनाडे महाराज चौकपर्यंत वाहतूक बंद राहील. भोईवाड़ा नाका से हिंदमाता जंक्शनपर्यंत वाहतूक बंद राहील. नायगाव क्रॉस ते सरफेयर चौक, परेल जंक्शन ते खानोलकर मार्ग वन-वे राहील.

दरम्यान मध्य रेल्वेच्या घाटकोपर ओव्हर ब्रीज, करी रोड, चिंचपोकळी, भायखला रेल्वे ओव्हर ब्रीज आणि पश्चिम रेल्वेचे फ्रेंच ब्रीज, केनेडी ब्रीज, बेलासिस ब्रीज, महालक्ष्मी स्टील रेल्वे ब्रीज, प्रभादेवी पारल रेल्वे ओव्हर ब्रिज, मरीन लाइन्स दरम्यानचा दादर तिलक ब्रीज, सँडहस्ट, ग्रँट रोड आणि चर्नी रोड असे 13 पुल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आलेय.