पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या मंगळवारी सकाळी ११ वाजता सादर केला जाणार आहे. संगणक प्रणालीद्वारे ई-बजेट तयार करण्यात आले आहे.
महापालिकेचा ४२ वा अर्थसंकल्प आहे. महापालिकेत १३ मार्च २०१२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे २०२३-२४ चा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनीच सादर केला होता. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वात दुसर्यांदा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तसेच प्रशासकीय राजवटीमधील दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. महापालिकेचे २०२२-२३ मध्ये 6,497 कोटी 2 लाख तर 2023-24 मध्ये अंदाजपत्रकात वाढ होऊन 7, 127 कोटी 88 लाखांचे झाले होते.