ताज्या बातम्या

बहिणींना 1500 देऊन, दोन महिन्यांत महागाई वाढवली – पटोले

भंडारा – राज्य़ातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले. परंतु, गेल्या 2 महिन्यात महागाईत वाढ केलीय. त्यामुळे बहिणींनी या बेईमान भावांना पुरते ओळखल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. महायुतीने काँग्रेसच्या विरोधात प्रसारित केलेल्या व्हिडीओला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी पटोले म्हणाले की, काँग्रेसने केलेल्या कायद्यानुसार बहिणींना वडिलांच्या संपत्तीत अर्धा हिस्सा मिळाला पाहिजे. तर आता दिवाळीच सण आणि अवघ्या काही दिवसात भाऊ बीजच सण आहे. ते भाऊ बहिणीच्या नाते प्रेमाचे संबध हे कायम ठेवले पाहिजे मात्र ह्या महायुतीसरकारने लाडक्या बहिनाना दीड हजार रुपये दिले आणि अवघ्या दोन महिन्यात महागाई वाढली आहे आणि लहान मुलीवर अत्याचार होत असून आता महाराष्ट्र मध्ये महिला मुली सुरक्षित नाही म्हणून आता लाडक्या बहिनाना समजून आले आहे त्यामुळे बहिणी ह्या महाविकास आघाडी सोबत आहेत असा दावा पटोले यांनी केला.