महाराष्ट्र

काँग्रेससोबत गद्दारी केल्यास सोडणार नाही!

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मते फुटली होती. निवडणूक झाल्यानंतर आमची काही मते फुटली असल्याचे खुद्द नाना पटोले यांनी मान्य केले आहे. काँग्रेस पक्ष या फुटीर आमदारांचे विश्लेषण करत आहे. वरिष्ठांना याबाबत कळवण्यात आले आहे. ज्या आमदारांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली त्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

ज्या आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली, त्यांना सोडला जाणार नाही. त्यांना पक्षात कोठेही स्थान राहणार नाही. जे घडले ते वरिष्ठांना कळवले आहे, त्यांच्याकडून भेटायला बोलावलं जाईल. किती लोक फुटले याचा आकडा येईल. आमचा सगळ्या आमदारांवर विश्वास होता, पण ह्या लोकांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला. आम्ही जी स्टेटर्जी केली, त्याला देखील हे लोक वागले नाहीत. त्यांना पक्षात स्थान नाही हीच कारवाई असेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. मागील १० वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये, प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले.

महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर दिल्लीला दिला जातो असे असतानाही राज्याला परतावा देताना भेदभाव केला जातो हे उघड असताना मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन फसवे वाटत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेली फेकाफेकी आहे असे पटोले म्हणाले.